विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा मृत्यू ! मुलं पोरकी झाली,दौंडच्या नांदगावात काळीज पिळवणारी घटना

Oct 23, 2025 - 18:53
 0  805
विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा मृत्यू ! मुलं पोरकी झाली,दौंडच्या नांदगावात काळीज पिळवणारी घटना

आय मिरर 

ऐन दिवाळी सणात शेळीला वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेला शॉक बसला, तिला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीलाही शॉक लागून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील नांदगाव येथे घडली आहे. 

दि.22 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दौंड तालुक्यातील नांदगाव येथे घटना ही धक्कादायक घडली असून या घटनेत राजाराम बापूराव खळदकर आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नानगाव येथे भीमा नदीच्या काठावर मनीषा खळदकर व राजाराम खळदकर हे शेळीला चारा पाणी देण्यासाठी गेले होते. शेळी चरत असलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्सला करंट आल्याने त्या बॉक्सला शेळी चिकटली. शेळीला विजेचा जोराचा धक्का लागला व ती शेळी त्या पॅनल बॉक्सला चिकटली.

शेळीला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच मनीषा खळदकर या शेळीला वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसला.ही घटना तिथे असलेल्या मनीषा यांचे पती राजाराम यांनी पाहिली अन् पत्नीला वाचवण्यासाठी राजाराम खळदकर गेले असता त्यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला.

दुर्दैवाने या अपघातात दुर्दैवाने शेळीसह पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.मृत मनीषा व राजाराम खळदकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शालेय शिक्षण घेत आहेत. घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून या भयानक घटनेमुळे नांदगाव गावावर शोककाळा पसरली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow