त्याने धारदार कोयता जवळ बाळगला बारामतीच्या यादवांना कुणकुण लागली अन् गेम झाला...

Oct 23, 2025 - 16:11
Oct 23, 2025 - 16:12
 0  3032
त्याने धारदार कोयता जवळ बाळगला बारामतीच्या यादवांना कुणकुण लागली अन् गेम झाला...

आय मिरर 

बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्या वेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.समर्थ सिद्ध मल्हारे रा.मालुसरेवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की बारामती तालुका पोलीस एका दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. याच दरम्यान खाबऱ्या मार्फत बारामती तालुका पोलिसांना समर्थ मल्हार हे हा स्वतःजवळ तलवार बाळगत आहे अशी गुप्त माहिती मिळाली. ही बातमी कानावर पडतात चंद्रशेखर यादव यांनी तपासाची चक्रे फिरवली.

बारामती एमआयडीसी परिसरातील एका डेअरी चे शेजारच्या परिसरात पोलिसांनी छापा टाकला आणि मल्हारे याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांना तलवार स्वतःच्या घरी ठेवल्याचे सांगितलं.

पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एक तलवार आणि लोखंडी कोयता मिळून आला जो पोलिसांनी याप्रकरणी जप्त केला आहे. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी संबंधित व्यक्ती विरोधात तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, अंमलदार केदारनाथ बिडवे, दादा दराडे, किशोर वीर, निलेश वाकळे, विलास खाडे, रवींद्र सोनवलकर, राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow