तुमची पन्नास वर्षांची दादागिरी आता चालणार नाही ! शिवतारेंचा माजी आमदार संजय जगतापांवर हल्लाबोल

Nov 29, 2025 - 14:54
Nov 29, 2025 - 15:02
 0  185
तुमची पन्नास वर्षांची दादागिरी आता चालणार नाही ! शिवतारेंचा माजी आमदार संजय जगतापांवर हल्लाबोल

आय मिरर 

सासवड येथे झालेल्या शिवसेनेच्या प्रचार सभेत विजय शिवतारे यांनी विरोधकांसह माजी आमदार संजय जगताप यांच्यावर नाव न घेता जोरदार शब्दांत टीका केली. “गेल्या पन्नास वर्षांपासून एकाच कुटुंबाची दादागिरी आणि दमदाटी चालते आहे; पण आता ती चालणार नाही. शिवसैनिकांची फौज उभी आहे,” अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला.

शिवतारे म्हणाले की 2008 पासून त्यांनी या प्रवृत्तीला रोखण्यासाठी संघर्ष केला. “एकाच घराण्याने सत्ता, बाजारपेठ, व्याजाचा धंदा आणि राजकारण हातात ठेवून लोकांना टाचेखाली ठेवले आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

नगरपालिकेवरील थेट आरोप...

सासवड नगरपरिषदेच्या कामकाजावर शिवतारेंनी कठोर टीका केली.1859 ची नगरपालिका आजही गटारविहीन आहे.2017 मध्ये त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात दिलेल्या 67 कोटींच्या गटार योजनेचे काम आजतागायत पूर्ण नाही, 36 कोटी तातडीने दिले तरी काम अर्धवट राहिल्याचा आरोप.सासवड देशातील पहिली नगरपालिका म्हणवते; पण पाणी पाच दिवसांनी येते, रस्ते नाहीत, सार्वजनिक शौचालय नाही — तरी दिल्लीला जाऊन पुरस्कार विकत आणतात व लोकांच्या डोळ्यात धूळफेक करतात.ओपन स्पेसमध्ये अनधिकृत पाणीपुरी व खाद्य स्टॉल, काही बगीचे कुलूपबंद आहे.शहर नियोजनाचा बोजवारा उडाला आहे अशी टीका शिवतारे यांनी केली.

विकास कामांची यादी मांडली...

शिवतारेंनी आपले कामकाज अधोरेखित करताना सांगितले की,पुरंदर उपसा सिंचनाची 750 कोटींची प्रकल्पयोजना पूर्ण, 15000 हेक्टर बागायती क्षेत्र तयार होईल.कऱ्हा नदीवरील अनेक बंधारे, शेतकऱ्यांच्या हातात पैसा येऊ लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले, पुढील 25 वर्षे रस्ते उखडावे लागणार नाहीत.जेजुरी गटार योजनेचा टप्पा 1 – 82 कोटी सुरू; टप्पा 2 – 87 कोटी मंजुरी प्रक्रियेत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आयटी पार्क — रोजगाराचा नवा अध्याय

शिवतारे म्हणाले की,3000 एकरवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुढील दोन महिन्यांत सुरू होते आहे. पाच वर्ष माझ्यावर अंत्ययात्रा काढल्या, आंदोलन केले, पण मी पुन्हा आमदार झालो; आणि आज मुख्यमंत्रीही ‘एअरपोर्ट होणार’ या भूमिकेत आहेत.शेतकरी स्वखुशीने जमीन देण्यास तयार, योग्य भावासह रोजगाराची हमी.दिवे-जांभळी येथील 1450 एकर सरकारी जमीन एमआयडीसीकडे, येथे उभे राहणाऱ्या आयटी पार्कमुळे किमान 2000 तरुणांना नोकऱ्या.सासवडचा परिसर पीएमआरडीमध्ये; “पुढील निवडणूक नगरपरिषदेची नाही, नव्या पुणे महानगरपालिकेची असेल. व्यापार-नोकऱ्यांच्या संधी प्रचंड वाढतील.”

विरोधकांवरील थेट प्रहार...

एका बाजूने तरुण बदलाला तयार आहेत आणि ते बिथरले आहेत. त्यांच्याकडे फक्त दम देण्याची भाषा उरली आहे.“भाजप माझा मित्र पक्ष आहे; पण सासवडमधील हा मूळ भाजप नाही" हा काँग्रेस युक्त भाजप आहे.माझ्यासमोर पडले म्हणून त्यांना इकडे घेतले. त्यांना दादागिरी करू देणार नाही.

तीनही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष — दावा

“सासवड, उरुळी देवाची आणि जेजुरी — तीनही नगरपरिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बहुमताने येणार,” असा ठाम दावा शिवतारेंनी केला.अफवा पसरवून मतदार भूलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

खंडोबाच्या देवस्थानातील विकासावरही टीका...

बारामतीतील माजी नेत्यांवर निशाणा साधत शिवतारेंनी सांगितले की, चार वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊनही खंडोबाच्या देवस्थानाचा विकास आराखडा तयार केला नाही.“346 कोटींचा आराखडा आम्ही बनवला; 109 कोटींचे काम पूर्ण झाले. खंडोबाला पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून दर्शन एकनाथ शिंदे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow