पुणे सोलापूर महामार्गावर पांढऱ्या गाडीत काय सापडलं तर 14 लाख 50 हजारांचा गांजा !
आय मिरर
दौंड तालुक्यातील धायगुडेवाडी येथे यवत पोलिसांनी गांजा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण 29 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.एका चारचाकी बलेनो गाडीतून या गांजाची वाहतूक करण्यात येत होती. गोपनीय माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी कारवाई करीत 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी शाकीर शब्बीर पानसरे आणि समाधान शिवाजी दाभाडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गुंगीकारक अंमलीपदार्थ गांजाचा माल वाहतुक होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती यवत पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धायगुडेवाडी गावाच्या हद्दीत एका हॉटेलच्या समोर नाकाबंदी लावून कारवाई केली.
या नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून हा गांजा वाहतूक होत असल्याचे छापे मारीत निदर्शनास आले.
या छापेमारीत 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा 29 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असेल पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचे चार चाकी वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी शाकीर शब्बीर पानसरे, मूळ रा. तालमीसमोर येवलेवाडी, ता. हवेली जि.पुणे सध्या रा. अहिल्यादेवी चौक चोरमले बिल्डींग सुपे ता. बारामती आणि समाधान शिवाजी दाभाडे, रा. अंतुलेनगर येवलेवाडी, ता. हवेली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?