बारामतीत पवारांना काँग्रेसचा धक्का ! सुनेच्या विरोधात दिला हा उमेदवार ; पहिली प्रतिक्रिया काय ?
आय मिरर
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने पवारांना धक्का दिलाय. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आला असून याठिकाणी काँग्रेसने ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवाराला संधी दिली आहे.बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून एडवोकेट आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आले आहे.यानंतर आकाश मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीत आम्ही काँग्रेस पार्टी म्हणून सक्षमपणे निवडणूक लढवणार आहोत, 21 एप्रिल पर्यंत आम्ही दिवसाची रात्र करून लोकांपर्यंत जाऊन आमचे मुद्दे त्यांच्यापुढे मांडणार आहोत.
उद्याची माझी उमेदवारी दाखल करायला हर्षवर्धन सपकाळ स्वतः येणार आहेत. यासोबत रासपचे नेते माजी मंत्री महादेव जानकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग पाटील चव्हाण यांसह बरीच मंडळी उपस्थित राहणार आहेत. असेही मोरे यांनी सांगितल आहे.
आकाश मोरे यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार आहेत.यापूर्वी देखील 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आले होती. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून एडवोकेट आकाश मोरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र याला अपयश आला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात बारामती विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना देखील सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. असं असताना ही निवडणूक लढवण्यावर काँग्रेस मात्र ठाम होती. स्वतः शरद पवार ही पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र सध्या तरी या प्रयत्नांना अपयश आल आहे.
बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात आता काँग्रेसचा उमेदवार मैदानात असणार आहे. सर्व ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील उद्या स्वतःची उमेदवारी दाखल करणार आहे त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे.
What's Your Reaction?