त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का ? वादग्रस्त वक्तव्यानंतर पडळकरांचा उलट सवाल
आय मिरर
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या वरती टीका टिपणी केली आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका करताना त्यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्या वरती ही वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर संपूर्ण राज्यभरातून गोपीचंद पडळकर यांच्या त्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान पडळकर मात्र आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई वरती खालच्या पातळीत टीका झाली तेव्हा शरद पवारांनी देवा भाऊंना फोन केला होता का ? मला तर कुठे दिसले नाही.
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते असताना त्यांच्या आई बद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून टीका झाली त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता का ? असा उलट सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.माफी मागायचा काय विषय येत नाही असही आमदार पडळकर म्हणाले आहेत.
यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्य...
गोपीचंद पडळकर हे भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पडळकर यांनी यापूर्वीही सातत्याने शरद पवारांच्या बाबतीत वादग्रस्त विधाने केलेली आहेत. त्यामुळे ते नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले.
आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका टिप्पणी करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यासोबत त्यांनी वडिलांचा उल्लेखही केला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचा याबाबतचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.. विविध ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा निषेध करत त्यांच्या पोस्टरची होळी करण्यात आहे.
What's Your Reaction?