'केलेल्या कामाची पोचपावती इंदापूरची जनता देईल' स्वार्थासाठी नाही तर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीसोबत आलो : भरत शहा
आय मिरर
इंदापूरच्या जनतेच माझ्यावर प्रेम राहील आहे.काम केलं त्याची पोच पावती इंदापूरची जनता आम्हाला देईल असा ठाम विश्वास मला आहे.शासन कसं चालवावं हे अजित पवारांकडून शिकावं,एका पत्राच्या मागणीवरून अजित दादांनी 382 कोटी रुपयाचा पूल दिला.त्यामुळे इंदापूरची बाजारपेठ वाढल्याशिवाय राहणार नाही.
जो काही विकास राहिला असेल ते अजित दादा दत्ता मामा आपण सर्व मिळून करूया आमच्या सर्व सहकाऱ्यांकडे इंदापूरच्या विकासाचे व्हिजन आहे.त्यासाठी भरभक्कम आशीर्वाद पाठीशी पाहिजे या भावनेमुळे तुमच्याकडे आलो आहोत.आम्ही स्वार्थासाठी प्रवेश केला नाही असं प्रतिपादन इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी केले.
इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरत शहा यांना दिलेली आहे. भरत शहा यांनी पक्षाच्यावतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर रविवारी 16 नोव्हेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भरत शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश पार पडला हे याप्रसंगी शहा बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहा म्हणाले की, सर्वप्रथम मी पक्षाचे आभार मानतो. पक्षात प्रवेश करताना आमचा कुठलाही स्वार्थ नाही.इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोण निधी देऊ शकतं असेल तर या पुणे जिल्ह्यातील ही दोन-तीन माणसेच निधी देऊ शकतात. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे होत.
आमचा पैसा कष्टाचा दोन नंबरचा नाही...
कोण म्हणत असेल की मामाने पैसे वाल्याला प्रवेश दिला तर आमच्याकडे पैसे आहेत,पण ते पैसे आमच्या कष्टाचे आहेत रात्रंदिवस आणि काम करतो. हा कष्टाचा पैसा आहे कुठल्याही दोन नंबरचा हा पैसा नाही.आमचं कुटुंब नीतिमूल्य जपणारं कुटुंब आहे.याच विश्वासावर इंदापूरची जनता आमच्या सोबत टिकून आहे.त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. अशा शब्दात भरत शहा यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांच्या आरोपांना उत्तर दिले.
जिथे होतो तिथंप्रमाणे काम केले.ज्या संस्थांमध्ये होतो ज्या पदावर होतो त्या पदाला पूर्ण न्याय देण्याचे काम केले.पदासाठी माझा प्रवेश नाही हे इंदापूरच्या जनतेला लक्षात घ्या.उतराई करू शकत नाही एवढं प्रेम इंदापूरच्या जनतेने दिले आहे. पैसा आज आहे उद्या नाही.केवळ पैसा काम करत नाही.माझ्यावर आणि आमच्या कार्यकर्त्यांवर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून पारदर्शी कारभार होईल हा शब्दही भरत शहा यांनी इंदापूरकरांना दिला आहे.
कोण म्हणतो आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून तिकडे गेले. परंतु मी सांगू इच्छितो की आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून इकडे आलो तिकडं आलो असा आमचा उद्देश नाही.इंदापूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आम्ही इकडे आलो आहोत.राजकीय नेत्यांपासून दूर राहिलो होतो तरी माझी इंदापूरची जनता माझ्याबरोबर आहे.
What's Your Reaction?