इंदापूर रोटरी कडून कांदलगावच्या दादासाहेब पाटील विद्यालयातील 65 विद्यार्थ्यांना मिळालं आयडियल स्टडी ॲप

Jul 26, 2025 - 07:48
Jul 26, 2025 - 19:05
 0  249
इंदापूर रोटरी कडून कांदलगावच्या दादासाहेब पाटील विद्यालयातील 65 विद्यार्थ्यांना मिळालं आयडियल स्टडी ॲप

आय मिरर

रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून तालुक्यातील कांदलगाव मधील दादासाहेब पाटील विद्यालय येथील दहावीच्या 65 विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप चे मोफत वितरण करण्यात आला आहे.या एका स्टडी ऍप ची किंमत पंधराशे रुपये इतकी आहे.

याच सोबत रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील करण्यात आलं तर नेहमीप्रमाणे इंदापूर मधील गांधी सराफ अँड कंपनी बारामतीकर यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश चा देखील मोफत वाटप करण्यात आले. 

संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी दादासाहेब पाटील विद्यालयाचे कार्याध्यक्ष अजित बाबर पाटील,इंदापूर रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष रो.नितीन शहा, गांधी सराफ अँड कंपनी बारामतीचे सर्वेसर्वा रो.नरेंद्र गांधी, विद्यालयाचे मुख्याध्यापक राम जमदाडे,इंदापूर रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रो.भीमाशंकर जाधव,रो.सुरेश मोरे, रो.सुहास राऊत यांसह शालेय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक राम जमदाडे यांनी इंदापूर रोटरी क्लब आणि गांधी सराफ अँड कंपनी बारामतीकर यांचे विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow