पुण्याच्या इंदापुरात धनगर समाज बांधवांचा रास्ता रोको, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी

Sep 23, 2025 - 13:14
 0  519
पुण्याच्या इंदापुरात धनगर समाज बांधवांचा रास्ता रोको, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी

आय मिरर 

जालना येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून पुण्याच्या इंदापूर शहरात बस स्थानकासमोर धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 

इंदापूर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने हा रास्ता रोको करण्यात आला.

दरम्यान जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक स्थळी दीपक बोऱ्हाडे यांनी सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्याच्या दृष्टीने आजचा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी इंदापूर पोलिसांचा पोलीस बंदोबस्त होता. तर वाहतुकीचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी इंदापूर पोलिसांनी अवजड वनांची वाहतूक वळवली होती.

यावेळी पोपट पवार,आप्पासाहेब माने,लक्षण देवकाते,अनिता खरात,किरण गोफणे,प्रवीण हरणावळ,ॲड.आकाश पवार,संजय शिंदे,संजय शिंदे,प्रदीप वाघमोडे,सचिन तरंगे, सुहास बुटे,बापू पारेकर,प्रदीप तरंगे,दादा मारकड,सतीश वाघमोडे,अतुल शिंगाडे,दिलीप भिसे यांसह विविध समाज बांधव उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow