पुण्याच्या इंदापुरात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
आय मिरर
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर एकीकडे पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संताप व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे मात्र ओबीसी बांधवांकडून पडळकर यांना समर्थन दर्शवल जात आहे.
आज मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी पुण्याच्या इंदापूर शहरात राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला ओबीसी बांधवांच्या वतीने दुग्धाभिषेक घालत त्यांना समर्थन दर्शवण्यात आलं.यावेळी एकच छंद गोपीचंद अशा घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी पोपट पवार, प्रकाश शिंदे,आकाश पवार, लक्ष्मण देवकाते, आप्पा माने,बापू पारेकर, राघू पारेकर, सचिन तरंगे, नाथा मारकड,प्रदीप वाघमोडे, किरण वाघमोडे, सतीश वाघमोडे, सुहास बुटे,महेश तरंगे,प्रदीप तरंगे,दादा मारकड,राजेंद्र तरंगे,सर्जेराव डोंबाळे दिलीप भिसे, अतुल शिंगाडे,सोन्या जानकर, राहुल शिनगारे आदी उपस्थित होते.
काय आहे प्रकरण...
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जयंत पाटलांनी आपल्याला एका प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं. सांगली जिल्ह्यातील जतमध्ये बोलत असताना पडळकरांनी हे वक्तव्य केलं.
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला, दरम्यान यावरून राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात काल सोमवारी सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे.
What's Your Reaction?