कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे असताना कर्जमाफी केली याचीही नोंद : मंत्री दत्तात्रय भरणे
आय मिरर
राज्य सरकारच्या कर्जमाफी वरून इंदापूरात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर सभेत महायुती सरकारचे आभार मानलेत.मात्र हे आभार मानत असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली कर्जमाफी ही कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे असताना केली याचीही नोंद माझी सुद्धा राहणार आहे. असंही भरणे यांनी जाहीर सभेत म्हटल आहे.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांसह उपाध्यक्ष संचालक मंडळ आणि शेतकरी वर्गाची उपस्थिती होती.
भरणे म्हणाले की,दादा तुम्ही मला जो विभाग दिला किंवा एखादं पद दिल तर त्या पदाचा उपयोग निश्चित ऐतिहासिक नोंदीसाठी होतो. याच उदाहरण म्हणून मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा दाखला दिला. दादा तुम्ही मला जो विभाग दिला किंवा एखादं पद दिल तर त्या पदाचा उपयोग निश्चित ऐतिहासिक नोंदीसाठी होतो.त्याच रात्रीच उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणीच्या दुःखाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण उभा राहिले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खूप मोठी कर्जमाफीची घोषणा केली.
या घोषणेमळे तुम्हाला आयुष्यात कधीही माणसं विसरणार नाहीत. शेतकऱ्याला शाश्वत असे उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे अडचणीच्या काळात खूप मोठं काम राज्य सरकारने केलेल आहे.दादा तुम्ही तिघांनी कर्जमाफी तर केलीच पण पण राज्याचा कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे असताना केली याचीही नोंद माझी सुद्धा राहणार आहे. असं मंत्री भरणे म्हणाले.
आज शेतकरी अडचणीत आहे.गेली सहा महिने राज्यात अतिवृष्टी होत आहे.काही भागात शेतकऱ्याच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. 2 कोटी एकर पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान झाले आहे.त्या शेतकऱ्यांना मदत करणे आमची जबाबदारी आहे.मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी काम करत आहेत.
मी स्वतःला भाग्यवान समजतो या छत्रपती कारखान्याने मला संचालक केले चेअरमन केले.या खुर्चीने एवढे शिकवले आहे कोणी काही म्हणाले तरी काही वाटत नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार देखील छत्रपती सहकारी साखर कारखान्यात संचालक झाले ज्या मातीने आम्हाला घडवले त्याची जाण असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
दादा देखील या कारखान्यात संचालक झाले आहेत.या कारखान्याने मातीने आम्हाला घडवले आहे याची जाण आहे.भविष्यात या कारखान्यासाठी जे करता येईल ते करील.राज्याचे आणि केंद्राच्या कृषी खात्याच्या अनेक योजना आहेत राज्याला तर फायदा मिळालाच पाहिजे पण आपल्या भागासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न असेल.या भागातील एखाद घर नसेल जी मागील पंढरवड्या पूर्वी यांत्रिकीकरणाची जी योजना जाहीर केली त्याचा लाभ मिळाला नाही.
ऊस कमी असताना आपल्याकडे सगळे येतील पण जास्त असताना कोणी येणार नाही.त्यामुळे आपल्या भागातील जे आहे ते जपा.छत्रपती च्या सभासदांनी वातावरण हलकं फुलकं ठेवा.श्री छत्रपती साखर कारखान्याचा ऊसाचा दर निश्चित प्रकारे चांगला राहील हा शब्द देतो.छत्रपती कारखाना काटा करण्याचे पाप कधी करणार नाही. असा विश्वास ही भरणे यांनी ऊस उत्पादक शेतकरी सभासद वर्गाला दिला.
What's Your Reaction?