मुस्लिम समाजाच्या मागण्या पूर्ण करणार : इंदापुरात अजित पवारांचं आश्वासन
आय मिरर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर होते.यावेळी इंदापूर मध्ये मुस्लिम समाज बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे शादी खाना आणि इतर काही मागण्या केल्या आहेत. यावेळी या सर्व मागण्या कायदेशीर बाबी तपासून पूर्ण केल्या जातील अस आश्वासन अजित पवारांनी मुस्लिम समाजाला दिल आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी इंदापूर दौऱ्यावर होते. इंदापूर शहरात पार पडणाऱ्या ढोले कुटुंबाच्या विवाह सोहळ्याला अजित पवार यांनी भेट दिली याप्रसंगी इंदापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी अजित पवार यांना आपले मागण्यांची निवेदन दिले.यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे देखील उपस्थित होते.
बारामती मध्ये ज्या शादी खाना उभा केला आहे त्याच पद्धतीने इंदापूर मध्ये तो उभा करावा. अशी मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माझ्याकडे होती. तुम्ही इंदापूर मध्ये जागा निवडा जागा निवडल्यानंतर आम्ही त्याला मी माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलतो आणि त्याला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडणार नाही आणि तो शादी खाना पूर्ण होईल असं मी बघतो असा आश्वासन यावेळी अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना दिल आहे.
इंदापूर मध्ये कुरेशी समाजाच्या संदर्भात तुम्ही अशी जागा निवडा तिथे लोकांचा विरोध राहणार नाही माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या इथे उजनी धरण फार जवळ आहे. त्यामुळे त्यासाठी प्रदूषण वगैरे फार गोष्टी बघाव्या लागतात. सरकारचा जो नियम आहे तेच मिशन आपलं पाहिजे. ते सूत्र तुम्हाला पाळावं लागेल. अशी माझी सर्व कुरेशी समाजाला विनंती आहे असंही अजित पवारांनी म्हटल आहे.
What's Your Reaction?