पैसेवाला म्हणून नाही तर भरत शहांकडे विकासाचे व्हिजन म्हणून उमेदवारी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
आय मिरर
मी विधानसभेला उमेदवार होतो तेव्हाच मला भरत शहा यांनी सहकार्य केलं आहे.त्यामुळे खरा प्रवेश त्याचवेळी झाला आहे. औपचारिकता म्हणून आज प्रवेश घेतला.शहांच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा चेहरा मोहरा बारामती सारखा कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
खूप मोठा त्याग शहा कुटुंबाने केला आहे. पैसेवाले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी नाही तर त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे म्हणून त्यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आहे.कोण म्हणतो की पैसेवाल्यांना पक्षाने संधी दिली तर ते चुकीच आहे शहा साहेब गर्भ श्रीमंत आहेत,शहराने त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर ते शहराचा चेहरा मोहरा बदलतील असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये व्यक्त केला.
इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरत शहा यांना दिलेली आहे. भरत शहा यांनी पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर भरत शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला याप्रसंगी भरणे बोलत होते.
भरणे म्हणाले की,मी कुणावरतीही टीका करणार नाही मी विकासाला मत मागणार आहे.भविष्यात इंदापूर शहराचा विकास कोण करू शकते आणि कोण नाही, ही इंदापूरची जनता हुशार आहे.आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना ही जनता विजयी करेल.मला आख्खा इंदापूर तालुका ओळखतो.मी उत्तर विकासाने देतो,मी लोकांमध्ये असतो,मी केवळ निवडणुकीपुरता लोकांसमोर जात नाही.
भरत शहा यांचा प्रवेशाचा कार्यक्रम हा छोटासा असल्याने या कार्यक्रमाला सर्वांना बोलावले नव्हते त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल आज जाहीर होणार आहे.या शहरासाठी ही मंडळी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत.मागच इंदापूर आणि आताचे इंदापूर याची तुलना मतदारांनी करावी.शहर बदलले का नाही,विकास झाला की नाही हे पहावे.अजूनही जे काही विकासाचे मुद्दे असतील जे जे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला करायचे आहे ते आपण करणार आहोत.
पाठीमागे भरत शहा आणि व्यापारी आले होते आणि अजित पवारांकडे त्यांनी शिरसोडी चा पूल मागितला.आणि तो मंजूर झाला हे भारतातील एकमेव उदाहरण आहे की तो अत्यंत तात्काळ मंजूर झाला.यामुळे इंदापूरची बाजारपेठ दोन वर्षात पाच पट वाढणार आहे.खूप मोठा बदल इंदापूर तालुक्यात होणार आहे.इंदापूर शहर बदलत आहे,स्वच्छतेच्या बाबतीत इंदापूरला पुरस्कार मिळत आहेत ही गोष्ट सोपी नाही.नगरसेवकांनी आणि शहरवासीयांनी साथ दिली म्हणून हे आपण करू शकलो.
अजित दादा सारखा प्रबळ नेता अन् आपण महायुतीत काम करत आहोत.त्यामुळे हा विकास आपण आपल्या तालुक्यात आणि शहरात करू शकलो.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपण साथ दिली पाहिजे.त्यांना मतदान दिले तर शहराचा चेहरा बदलणार आहे.त्यासाठी प्रत्येकाने घरोघरी जावा राष्ट्रवादी पक्षाला मत का द्यायचं हे पटवून सांगा आपल्या शहराची जर प्रगती होणार असेल तर लोक खूप हुशार असतात ते तुम्हाला नक्की मत देतील.
भरत शेठ शहा यांसारखा व्यक्ती आपल्या सोबत आहे.आज शंकरराव पाटील,घोलप साहेब गणपतराव पाटील यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही.खूप मोठा त्याग शहा कुटुंबाने केला आहे.त्यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आहे.सर्वांनी राष्ट्रवादी च्या घड्याळाचा प्रचार करावा.तरुणांची शक्ती मोठी असते आज अनेक तरुण इथे दिसत आहेत.ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्याचं स्वागत करतो सर्व मिळून शहरासाठी चांगलं काम करू असं आश्वासन यावेळी भरणे यांनी दिले.
हे पंधरा दिवसाचे कारस्थान नाही...
हे पंधरा दिवसाचे कारस्थान नाही तर हे विधान सभेपासून ठरलेला कार्यक्रम आहे अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी नाव न घेता प्रदीप गारटकर यांच्यावर केली.एवढी काय शहा कुटुंबापासून चिड आहे असा सवाल विचारत या कुटुंबाचे शहरावरती उपकार आहेत.या माणसाला प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे अस आमचं आवाहन आहे.याची कारण वेगळी आहेत असं ते म्हणाले.
हा प्रवेश कागदावरचा आहे कारण विधानसभेच्या वेळेस त्यांनी घड्याळाचे काम केले आहे.इंदापूर शहरात भरत शेठ एकटे आले तर तीन माणसे एक झाली,उद्यापर्यंत आणखी लोक या ठिकाणी सहभागी होतील.जुन्या लोकांनी या तालुक्याचा वेगळा इतिहास तयार केला आहे.शहा परिवाराबाबत इंदापुरात आदराची भावना आहे.तालुक्याचा आमदार दत्ता मामा आहे,विकास निधी कोण आणू शकतो हे लोकांना माहित आहे.आणि पुढे देखील मामाच आमदार राहणार आहेत.शंभर टक्के आपली सत्ता येणार आहे.लोकांनी ठरवले आहे भरत शहा यांना नगराध्यक्ष म्हणून स्वीकारले आहे अस ही ते म्हणाले.
What's Your Reaction?