गोरगरीब जनता हीच माझी ताकद ! त्यांना केंद्रबिंदू मानून सेवा करा : कृषिमंत्री भरणे

Sep 28, 2025 - 18:48
Sep 28, 2025 - 18:48
 0  506
गोरगरीब जनता हीच माझी ताकद ! त्यांना केंद्रबिंदू मानून सेवा करा : कृषिमंत्री भरणे

आय मिरर 

परमेश्वराने तुम्हाला आम्हाला सर्वांना एक संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करा गरीब रुग्णांना कशी मदत करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.आज मी जरी राज्याचा कृषिमंत्री असलो तरी तालुक्यातील गरीब माणसं हीच माझी ताकद आहेत गरीब माणसांना केंद्रबिंदू मानून रुग्णांची सेवा करा.असं आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे केले.

पुण्याच्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचे उद्घाटन पार पडलं यावेळी मंत्री भरणे बोलत होते.

मंत्री भरणे म्हणाले की, गोरगरीब रुग्णांची सेवा हे एक पुण्याचा काम आहे. हे तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही. हे पुण्य तुम्ही वाटून घ्या. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा द्या तो रुग्णालयात येते वेळी जरी नर्वस असला दुःखी असला तरी जाते वेळी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असायला हवा.

डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ले यांच्या माध्यमातून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे चांगला वैद्यकीय अधीक्षक मिळाला आहे, त्यांच्या माध्यमातून एक चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न आपण करूया. इतर डॉक्टरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा. असे आवाहनही मंत्री भरणे यांनी केले.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या रुग्णांबाबत शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन थेटर चे काम अपूर्ण आहे याचा तातडीने पाठपुरावा केला जाईल.इंदापूर नगरपरिषद ही शहरापुरती आहे ती त्यांच्या शहरापुरता विचार करेल परंतु आपल्याला शहरापुरता विचार करून चालणार नाही कारण आपल्याला तालुक्याचा विचार करावा लागेल. मी याबाबतीत अधिकच लक्ष घालीन.इंदापूर जिल्हा रुग्णालयात आता औषधांचा पुरवठा आहे भविष्यात त्याचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जाईल.सोनोग्राफीच्या बाबतीत आपल्याकडे स्पेशालिस्ट नाही तो कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न केला जाईल.

माझ्या तालुक्यातील गरीब गरजू रुग्णांना या शासकीय रुग्णालयातून चांगल्या प्रकारची सेवा मिळाली पाहिजे. सध्या माणसं खूप अडचणीत आहेत आपण या समाजाचा काहीतरी देणं लागतो याचा विचार करू आपण आलेल्या रुग्णांना सेवा द्यावी. आज मी जर मंत्री असलो तरी गरीब माणसांच्या चेहऱ्यावर कसा आनंद होईल ही माझी बांधिलकी आहे आणि मी ती जपतो. मी देखील त्या पद्धतीने कृती करायला हवी.

गोरगरिबांच्या सेवेसाठी मी स्वतःच्या पैशाने माणसे ठेवले आहेत शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय यातून मला समाधान मिळतं याची कोणतीही पेपरबाजी मी करत नाही. कदाचित या गोरगरिबांच्या आशीर्वादामुळेच राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता चाललेला असावा. एखाद्याच खाजगी रुग्णालय असेल आणि तुमची गरज असेल तर अशावेळी तुम्ही शासकीय दवाखाना आहे हा विचार न करता त्यांच्या मदतीला धावा. वयोश्री योजनेच्या माध्यमातून गरजवंतांना मदत करत आहोत. कोरोना कालावधीत तालुक्यातील गरजवंतांना सर्वाधिक मदतीची किट वाटणारा आमदार मी एकमेव होतो मात्र त्याचा कुठेही निवडणुकीत प्रचार केला नाही तरी देखील मला त्याचा फायदा झाला हा आशीर्वाद असतो.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर झाले कार्यान्वित....

इंदापूर जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून त्याचा उद्घाटन आज कृषी मंत्री भरणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भरणे यांनी त्या ठिकाणचा सविस्तर आढावा ही घेतला. ज्या रुग्णांना डायलिसिस ची आवश्यकता आहे त्यांना आता पुणे मुंबई सारख्या किंवा इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही ही संपूर्ण वैद्यकीय सेवा इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आता मोफत कार्यान्वित करण्यात आलेली आहे.या ठिकाणी युनिट कार्यान्वित करण्यात आले आहेत.याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री भरणे यांनी केले. 

दरम्यान इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांकरता गरम पाण्याच्या सोयीकरता दोन हजार लिटरचा सौर सोलर आणि पिण्याच्या पाण्याकरिता वॉटर फिल्टर तातडीने आठ दिवसाच्या आत बसवला जाईल अशी ग्वाही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी दिली.ज्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचा विचार केला जाईल.यावेळी रुग्णालयातील अडीअडचणी इतर समस्या यावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे,दिलीप वाघमारे, एडवोकेट आक्रम शेख, माजी नगरसेवक सुधीर मखरे,प्रशांत सिताफ,अशोक मखरे,आझाद पठाण यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी आणि इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ले व त्यांचे इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow