मोठी बातमी | कर्मयोगी कडून शेतकऱ्यांची दीपावली होणार गोड...
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.दीपावली साठी कर्मयोगी कारखान्याकडून ऊस गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर रुपये प्रति टन प्रमाणे ऊस बिलाची रक्कम जमा होणार आहे.
मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसाला कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याकडून यापूर्वीच ऊस उत्पादकांच्या खात्यामध्ये 2 हजार 800 रुपये प्रति टन प्रमाणे जमा केलेले आहेत.
त्यानंतर आता दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला हा सण आनंदाने उत्साहाने साजरा करता यावा याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन शंभर रुपये प्रमाणे बिल जमा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात संचालक मंडळाची शनिवारी 11 ऑक्टोंबर रोजी बैठक पार पडली.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.
त्यानुसार लवकरच ज्या शेतकऱ्यांचा ऊस मागील गाळप हंगामात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला आला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.
What's Your Reaction?