मोबाईल टॉवरच्या केबला चोरल्या पत्र्याच्या शेडमध्ये बसून तारा काढण्याचं काम सुरू होतं तोच सुपा पोलिसांना खबर लागली अन्....
आय मिरर
बारामती तालुक्यातील सुपा पोलिसांनी मोबाईल टॉवरच्या केबल चोरी करणारी चौघांची टोळी गजाआड केली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरडोली, बाबुर्डी आणि कुतवळवाडी गावचे हद्दीत मोबाईल टॉवर वरील केबलची चोरी करून हे आरोपीतील तांब्याच्या तारा विकायचे.ओम राजेंद्र कासवदे, संतोष सतिश गायकवाड, करण भाऊसाहेब आरवडे हे तिघेही बारामतीच्या मोरगाव मधील रहिवासी आहेत तर आण्णा आंबादास कोकाटे हा धाराशिवच्या परांडा तालुक्यातील कुंभेज मधील रहिवासी आहे.
या संशयित आरोपींकडून पोलिसांनी दोन मोटरसायकली यासह इतर साहित्य मिळून अंदाजे दोन लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींकडून आणखीन काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता सुपा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी दिलेल्या माहिती, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत हे ८ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत होते. यादरम्यान पोलीस हवालदार भाग्यवंत यांना बारामती तालुक्यातील तरडोली गावाच्या हद्दीत शंकर खरात यांच्या पत्राच्या शेडमध्ये काही व्यक्ती चोरलेल्या मोबाईल टावरचे केबल आणि मोटारीचे केबल यामधील तांब्याच्या तारा काढत आहेत याची खबर मिळाली.
ही बाब पोलीस हवालदार भाग्यवंती यांनी तात्काळ आपली वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांना कळवली. तातडीने पोलीस अधिकारी नवसरे, पोलीस हवालदार भाग्यवंत पोलीस शिपाई किसन ताडगे,अमोल चिरमे आणि मवाळ यांनी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घटनास्थळावर छापा घातला.
सुपा पोलिसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी १) ओम राजेंद्र कासवदे, वय १९ वर्षे, २) संतोष सतिश गायकवाड, वय १९ वर्षे, ३) करण भाउसाहेब आरवडे, वय १९ वर्षे, सर्व रा. मोरगाव, ता.बारामती, जि.पुणे, ४) आण्णा आंबादास कोकाटे, वय २९ वर्षे, रा.कुंभेज, ता. परांडा, जि.धाराशीव हे केबल मधुन तांब्याच्या तारा काढत असताना मिळुन आले.
सुपा पोलिसांना घटनास्थळी तीन केबल कटर टॉवर केबल व सोडलेल्या तांब्याच्या तारा मिळवून आल्या. सदरील व्यक्तींकडून पोलिसांना कोणतेही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध सोफा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2025 दरम्यान सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरडोली, बाबुर्डी आणि कुतवळवाडी गावचे हद्दीतील मोबाईलचे टॉवर वरील केबलची चोरी करून त्या सोलुन त्यामधील तांब्याच्या तारा काढलेल्या आहेत अशी कबुली दिली.
सुपा पोलिसांनी या संशयित आरोपींकडून दोन मोटरसायकल यासह इतर साहित्य मिळून अंदाजे दोन लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वाघोले व पोलीस हवालदार गजरे करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक कोळी, मोहरकर, जयंत ताकवणे, सहा.फौजदार वाघोले, पो.हवा.राहुल भाग्यवंत, विशाल गजरे,रुपेश साळुंके, संदिप लोंढे,अनिल दणाने,पो.कॉ.अमोल चिरमे, किसन ताडगे, महादेव साळुंके, निहाल वणवे, सागर वाघमोडे, सचिन दरेकर यांनी केलेली आहे.
What's Your Reaction?