शेतकऱ्यांच्या शेळ्या बोकड चोरणारा सुपा पोलिसांनी केला गजाआड

Jun 2, 2026 - 19:01
Jun 2, 2026 - 19:02
 0  200
शेतकऱ्यांच्या शेळ्या बोकड चोरणारा सुपा पोलिसांनी केला गजाआड

आय मिरर 

बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळाखडेवाडी मध्ये शेळ्या व बोकड चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेत आणि तांत्रिक तपासद्वारे तपास करत आरोपीला गजाआड केल आहे.सौरव संजय सूर्यवंशी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो लोणी भापकर येथील शिंदेवस्ती वरील रहिवाशी आहे. 

रामचंद्र यदु शेंडगे वय 50 वर्षे यांनी सुपा पोलीस स्टेशन त्यांच्या घरासमोरून शेळ्या बोकड चोरी केल्याची तक्रार नोंदवली होती. याची दखल घेत सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रकाश पवार यांनी तातडीने याचा तपास होत सुरू केला.

पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपासादरम्यान परिसरातील माहिती संकलित करून तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान सौरव संजय सूर्यवंशी याच्यावर संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरीस गेलेला मुद्देमाल त्याच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आरोपीकडून चोरीस गेलेला चार करडे, दोन पाटी व एक बोकड असा एकूण अंदाजे रुपये ३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस अंमलदार किसन तांडगे,महादेव साळुंखे,सोमनाथ होले, भाऊ चौधरी यांनी पार पाडली पडली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंखे हे करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow