इंदापूर नगरपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल ! नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून सोमवंशी यांची उमेदवारी दाखल
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेसाठी आज नगराध्यक्ष पदाकरिता पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महादेव वसंत सोमवंशी यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला आहे.
दहा नोव्हेंबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झालेले असताना इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी गेल्या दोन दिवसात एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही. आज तिसऱ्या दिवशी इंदापूर मधून नगराध्यक्ष पदाकरिता पहिला नामनिर्देशन अर्ज शिवसेना (उबाठा) गटाने दाखल केला आहे.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमदार सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार आज इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल सोमवंशी यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. इंदापूर शहरात यापूर्वीही शिवसेना ठाकरे गटाने इंदापूर शहरातील नागरिकांच्या हितासाठी अनेक आंदोलने केली आहेत.विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. कोरोना काळात ठाकरे गटाचा शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी जीवावर खेळून सुद्धा ते काम करत होते. इंदापूरकरांनी मला मतदान रुपये आशीर्वाद देऊन शहरात सेवा करण्याची संधी द्यावी. त्यांचा मत मी वाया जाऊ देणार नाही त्यासाठी इंदापूरकरांचा आशीर्वाद हवा आहे असं सोमवंशी यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शहा कुटुंबाच्या भूमिकेकडे लक्ष...
इंदापूर नगर परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असला तरी अद्यापही इंदापूर शहरवासीयांची नजर ही इंदापूर शहरातील दिग्गट समजल्या जाणाऱ्या शहा घराण्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. शहा कुटुंबातील इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे निश्चित असलं तरी ते अपक्ष लढणार की कोणत्या बड्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही अद्याप पर्यंत नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण हे घोषित केलेले नाही. तर दुसरीकडे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाकरिता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे शहा आणि गारटकर यांच्या भूमिकेकडे शहरातील मतदारांचे लक्ष लागून आहे.
What's Your Reaction?