इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग, शहा परिवाराकडून नगरपरिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ ! माजी नगराध्यक्ष अंकिता शहांकडून घरोघरी जात माहिती पुस्तकाचं वितरण

Nov 5, 2025 - 14:56
Nov 5, 2025 - 14:56
 0  511
इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग, शहा परिवाराकडून नगरपरिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ ! माजी नगराध्यक्ष अंकिता शहांकडून घरोघरी जात माहिती पुस्तकाचं वितरण

आय मिरर 

इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदासाठी इंदापूर मधील शहा परिवार मैदानात उतरला आहे. शहा परिवारातील इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इंदापूर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून शहा परिवारांन प्रचाराचा शुभारंभ देखील केलाय.

माजी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा आणि वैशाली शहा यांसह शहा समर्थक घरोघरी जाऊन पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत.शहा परिवारातील अंकिता मुकुंद शहा या इंदापूर नगरपरिषदेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष होत्या. मागील पाच वर्ष इंदापूर नगर परिषदेवरती शहा परिवाराची सत्ता राहिली आहे. आता त्याच कुटुंबातील माजी उपनगराध्यक्ष भरत शहा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत.

 राज्य निवडणूक आयोगाकडून काल नगर परिषदेसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर मध्ये शहा परिवार निवडणुकीसाठी सज्ज झालाय. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. 

2017 साली जनतेतून अंकिता मुकुंदा शहा या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात शहरात केलेली विकास कामे महत्त्वपूर्ण निर्णय या संदर्भातील एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली असून या पुस्तिकेच्या माध्यमातून इंदापूर शहराचा कसा कायापालट झाला आणि विकासाची कोणती कामे झाली याचा संपूर्ण आलेख मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर सोबतच भविष्यातील विकासात्मक इंदापूर कसा असेल आणि कोणती कामे प्रस्तावित आहेत याचाही आलेख मतदारांपुढे मांडला जातोय.

आज सकाळपासून माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, शहा परिवारातील वैशाली शहा यासोबतच शुभम पवार, अक्षय सूर्यवंशी,प्रमोद राऊत, निखिल महाजन, अभिजीत अवघडे यांसह शहा समर्थक मतदारांच्या गाठीभेटी घेत असून ही माहिती पुस्तिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आणि आपण केलेलं काम पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहा कुटुंबाची उल्लेखनीय कामगिरी...

2017 साली इंदापूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली होती यावेळी तत्कालीन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंकिता मुकुंद शहा या काँग्रेस आयच्या चिन्हावरती इंदापूर नगर परिषदेवरती लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. अंकिता शहा या माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या थोरल्या वहिनी होत.नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात इंदापूर नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग पाच वर्षे देशपातळीवर इंदापूर नगर परिषदेचा नावलौकिक झाला आहे.शहरात नवीन व्यापारी संकुल,अत्याधुनिक नगरपरिषद भवन,शुद्ध पाण्याचा अखंड पुरवठा,शहर कचरामुक्त करण्यासाठीचे उपक्रम, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे निर्णय तसेच अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, ऑक्सिजन पार्क व बायोडायव्हर्सिटी प्रकल्पांतर्गत हजारो वृक्षांची जोपासना अशा विविध कामांमुळे शहा परिवाराचे कार्य सर्वदूर चर्चेत आहे.

यासोबतच सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सातत्यपूर्ण आयोजनामुळे शहा परिवाराने इंदापूरच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भरत शहा यांच्या नगराध्यक्ष पदाला शहरातून व्यापक पसंती मिळेल असा अंदाज आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow