गणेशोत्सवाच्या काळात गांजा विक्री, वालचंदनगर पोलिसांकडून दोघांवर कारवाई  

Sep 9, 2025 - 18:08
Sep 9, 2025 - 18:10
 0  600
गणेशोत्सवाच्या काळात गांजा विक्री, वालचंदनगर पोलिसांकडून दोघांवर कारवाई  

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे गणेशोत्सवाच्या काळामध्ये गांजा विक्री केल्याप्रकरणी वालचंद नगर पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. इंदापूर न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आता त्यांची रावानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर वालचंद नगर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.

शुभम वामन निगडे वय २४ वर्षे रा. निरवांगी आणि अक्षय बाळासाहेब कदम वय २८ वर्षे रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे असून त्यांच्याकडून वालचंदनगर पोलिसांनी दोन किलो गांजा ही जप्त केला आहे. याप्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती वालचंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमसाखर गावच्या हद्दीमध्ये शुभम निगडे हा गांजा आणून विक्री करत असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी निमसाखर गावच्या हद्दीमध्ये बीकेबीएन रस्त्यावर संबंधितांना पकडण्यासाठी सापळा लावला.यावेळी कळंब बाजूकडून निमसाखर गावच्या दिशेने दुचाकीवरून गांजा घेऊन आलेल्या शुभम निगडेवर छापा टाकून कारवाई करत त्याला ताब्यात घेतले होते.

निगडे यांच्याकडून चौकशी केली असता त्याने अक्षयकडून गांजा विक्रीसाठी आणत असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून इंदापूर न्यायालयाने ९ सप्टेंबर पोलिस कोठडी दिली होती.त्यानंतर त्यांना नऊ सप्टेंबर रोजी इंदापूर न्यायालयासमोर हजर केले असता इंदापूर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगरचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलिस हवालदार गुलाब पाटील, शैलेश स्वामी, गणेश काटकर, विकास निर्मळ, सचिन जमदाडे, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, किरण पेडकर यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow