इंदापूर पोलिसांकडून विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे,14 जणांवर दाखल केले गुन्हे

Sep 26, 2025 - 08:31
Sep 26, 2025 - 08:33
 0  770
इंदापूर पोलिसांकडून विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे,14 जणांवर दाखल केले गुन्हे

आय मिरर 

इंदापूर पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर अवैध धंद्यांवरती कारवाई केली आहे. यात पोलिसांनी तीन ठिकाणी मटका अड्ड्यांवर छापा घालत नऊ जणांवर गुन्हे दाखल केलेत तर पाच ठिकाणी दारू अड्ड्यांवर कारवाई करत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बावडा येथे एसटी स्टँड च्या पाठीमागील लोहार गल्ली मध्ये केलेल्या कारवाईत बाळासाहेब त्रिंबक कळसाईत वय 52 वर्षे रा. बावडा, लोहार गल्ली ता. इंदापुर आणि शंकर भिमराव भोंग रा.निमगाव केतकी ता. इंदापुर या दोघांवरती महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.तर 480/- रूपये रोख रक्कम पोलिसांनी त्या ठिकाणाहून हस्तगत केली आहे. 

बावडा सोबतच लाखेवाडी परिसरात ही बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या मटक्यावर छापा टाकलाय. यात सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी पाच जणांवर कारवाई केली असून पप्पु दादा भिंगारदीवे,राजशैल्य युवराज कळसाईत,चंद्रकांत किसन बराकडे,सुरज दिलीप खाडे या लाखेवाडी येथील चौघांसह इंदापूर शहरातील प्रमोद मारुती सातव याच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याव्यतिरिक्त इंदापूर पानदरा परिसरातील जुगार अड्ड्यावर कारवाई करत आठशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तर आप्पा बबन भोसले आणि नितीन दत्तू पांढरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पाच ठिकाणी दारू विक्रीवर छापे, पाच जणांवर गुन्हे 7818 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत...

दुसरीकडे इंदापूर पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री वरती देखील कारवाई केली आहे.तालुक्यातील राजवडी येथे पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री वरती कारवाई करत आठशे रुपये किमतीचा मुद्द्यामाल हस्तगत केलाय तर पोलिसांनी शिवाजी सुधाकर हाके वय 29 वर्षे रा राजवडी ता.इंदापुर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका परिसरात कारवाई करत 560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी मेजरर्सिंग परमजितसिंग जाट रा. गणेशनगर, इंदापुर याच्यावर गुन्हा दाखल केलाय. 

यासोबतच सरडेवाडी येथील जाधव पाटीवर देखील अवैद्य दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे या ठिकाणावरून सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून एका महिला विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

तर बावडा येथील बेकायदेशीर दारू विक्री कारवाईत 3785 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करीत बाळासाहेब विक्रम कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.नरसिंगपूर येथील बेकादेशीर दारू विक्री कारवाईत दोन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत नाना अनंता सरवदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow