इंदापुरात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात धरणे आंदोलन ; आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवार दि. 22 सप्टेंबर पासून इंदापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाच्या विरोधात इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.आज मंगळवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे सुरू आहेत. तसेच, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी या आंदोलकांची आहे.
या धरणे आंदोलनात ॲड.बापूसाहेब साबळे, तानाजी धोत्रे, बाळासाहेब सरवदे, ॲड.राहुल मखरे, माउली नाचण,ॲड.कमलकांत तोरणे,ॲड.एस.एन.पोळ, हनुमंत कांबळे, सुरज धाईजे, शरद चितारे, सुरज वनसाळे, ॲड.राहुल बनसोडे,अनिल कांबळे, दत्तात्रेय जगताप, संजय कांबळे, महादेव लोंढे,ॲड.समीर मखरे, नितीन झेंडे आदी पहिल्या दिवशी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.
पोलीस निरीक्षक कोकणेंनी आरोप फेटाळले...
दरम्यान या संदर्भात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रतिक्रिया दिली असून इंदापूर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून अवैध धंद्यावर पोलिस प्रशासनाकडून सतत कारवाई करण्यात येत असते. याबाबतची माहिती आंदोलनकर्त्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही, तसेच तक्रार आल्यानंतरच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तपासाअंती त्याबाबतचा अहवाल न्यायालयात दाखल केला आहे असं ते म्हणाले.
What's Your Reaction?