बारामतीच्या झारगडवाडीत साबुदाणा आणि भगरीची भाकरी खाल्ल्याने चौघांना विषबाधा ?
आय मिरर
साबुदाणा आणि भगरीच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील चौघांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या चौघांवर ही बारामती मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी मध्ये ही घटना घडली असून या चारही महिलांना उलटी आणि जुलाब चा त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांना तातडीने उपचार कामी डोरलेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं.
यातील दोन महिलांना बारामती मधील अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार कामी हलवण्यात आलं आहे. या चारही महिलांवर उपचार सुरू असून सध्या या चारही महिलांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने झारगडवाडी येथील किराणा दुकानांची तपासणी केली असून विक्री करणात येत असलेलं भाकरीचे पीठ देखील तपासणी कामी ताब्यात घेतल आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर याच नेमकं कारण समजू शकणार आहे.
What's Your Reaction?