स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इंदापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ; हर्षवर्धन पाटलांनी दिले संकेत
आय मिरर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माझ्यासाठी नवीन नाहीत गेले 40 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवूनच मी राजकारणात आलो आहे.त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊद्या आम्ही इंदापूर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे म्हणत ज्याच्या त्याच्या सोयीने कोण जात असतो कोण येत असतो तुम्हाला लवकरच कळल तालुक्यात अजून काय काय होतंय असं म्हणत राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
हर्षवर्धन पाटील हे इंदापूरातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोगी ओंकार शुगर फॅक्टरीच्या 36 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
अगदी कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होईल अशी स्थिती आहे त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंदापूर तालुक्यात काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.त्याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेकडे ही सर्वांचे लक्ष लागून आहे.
अद्याप इंदापूर नगर परिषदेचा निवडणुकीमधील नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण ? हे ना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ना शरद पवार गटाकडून घोषित करण्यात आलंय आणि त्यामुळेच इंदापूर मध्ये या दोन्ही पक्षाच्या बाजूकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेकडे ही इंदापूर वासियांची नजर लागून आहे.
इंदापूरच्या राजकारणातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने हे दिग्गज नेते आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत या तीनही नेत्यांची नेमकी काय भूमिका राहते आणि ही तीनही नेते कशा पद्धतीने आखणी करून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतात याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
अशातच हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ द्या आमची तयारी सुरू आहे आणि इंदापूर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही ताकतीने लढणार असं म्हटलं आहे. त्यामुळे इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काटे की टक्कर होणार का ? की या निवडणुकीत माने आणि पाटील हे एकत्र येणार याचीही चर्चा रंगली आहे.
कर्जमाफी करणार आहात तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे बँकांचे तगादे नकोत...
राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता बँकांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे तगादे लावू नयेत. बँकांकडून केली जाणारी 31 डिसेंबर किंवा 31 मार्चपर्यंत कर्ज वसुली थांबवली पाहिजे. अशी मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.तुम्ही कर्जमाफी करणार असल्यामुळे तुम्ही सक्तीची कर्ज वसुली कशी करू शकता असाही प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी विचारला आहे.
पाटलांच्या तोंडी भाजपचा गोडवा...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर सभेत तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चांना उधान हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या कौतुकामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगाकरता इथेनॉलचे धोरण असेल, इन्कम टॅक्स माफी धोरण असेल यामुळे बघता बघता हा साखर धंदा बायोटेक्नॉलॉजी च्या माध्यमातून समोर येणार आहे, ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून पुढे येणार आहे.येणाऱ्या काळामध्ये जगाला इथेनॉल पुरवठा करण्याचे काम, ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर पुरवण्याचे काम आज आपल्या देशामधून होत आहे याचा आम्हाला गर्व आहे. असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
गेल्यावेळेस आमचा कारखाना अडचणीत होता यावर आमच्या कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीडीसी मधून दीडशे कोटीची मदत केली याचाही उल्लेख हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला.
What's Your Reaction?