चहाचे घोट घेत दीपक जाधव यांचा प्रचाराचा धडाका,पत्नी हर्षदा राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या आखाड्यात...

Jan 15, 2026 - 19:21
Jan 15, 2026 - 19:22
 0  1455
चहाचे घोट घेत दीपक जाधव यांचा प्रचाराचा धडाका,पत्नी हर्षदा राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या आखाड्यात...

आय मिरर 

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्या करिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय.शुक्रवार 16 जानेवारी पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता प्रत्यक्षात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. तत्पूर्वीच इंदापुरात पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर नेते दीपक जाधव यांनी गाव भेट दौरे सुरू केले असून चहाचा घोट घेत कोपरा बैठकींच्या माध्यमातून दीपक जाधव यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे फायर नेते दीपक जाधव यांच्या पत्नी हर्षदा जाधव यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच जाधव कुटुंबीय गट करून जिल्हा परिषद गटातील गावे पिंजून काढताना पाहिला मिळत आहेत. 

पत्नी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली असल्याने मागच्या वेळेस हुकलेली संधी यावेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी दीपक जाधव रात्रीचा दिवस करताना पाहायला मिळत आहेत. युवकांचं मजबूत संघटन आणि प्रत्येकाला आपलं वाटणार नेतृत्व या निवडणुकीच्या निमित्ताने कोपरा बैठकीच्या माध्यमातून गावोगावी खेडोपाड्यात पोहोचत असून मतदार देखील तितक्याच उस्फुर्तेने दीपक जाधव यांना आपलं समर्थन देताना पाहायला मिळत आहेत. 

कोपरा बैठकीच्या माध्यमातून चहाचा घोट घेत पक्षाची ध्येय धोरणे आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कल्पनेतील इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची ब्लू प्रिंटच दीपक जाधव हे मतदारांपुढे मांडत आहेत. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील सर्व समस्या तर आपण मार्गी लावूच शिवाय मूलभूत असणारे प्रश्नही सोडवले जातील अशी ठोस आश्वासनही ते मतदारांना देताना पाहायला मिळत आहेत. 

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी 16 जानेवारी पासून सुरुवात होत असल्यानं सध्या अनेक इच्छुकही मैदानात उतरलेत.राष्ट्रवादी काँग्रेस कडून हर्षदा जाधव यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.हर्षदा जाधव यांच्यापुढे जर तोडीस तोड उमेदवार मैदानात उतरवला तरच या जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही लक्षवेधी होईल.त्यामुळे हर्षदा जाधव यांच्यापुढे विरोधक कोणता तगडा उमेदवार उभा करत आहेत याचीही उत्सुकता मतदारांना लागून राहिलेले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow