ब्रेकिंग | कर्नाटकात एसबीआय बँकेवर सर्वात मोठा दरोडा 21 कोटींचा ऐवज लुटला...
आय मिरर
कर्नाटक मध्ये सर्वात मोठा दरोडा पडला आहे.कर्नाटकातील एसबीआय बँकेवर अज्ञान दरोडेखोरांनी दरोडा टाकत 21 कोटींचा ऐवज लुटला आहे. हा दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर ऐवज घेऊन सोलापूरच्या दिशेने पळण्याचा पोलिसांना संशय आहे.
कर्नाटकातील हा सर्वात मोठा दरोडा असून दरोडेखोर आणि एसबीआय बँकेमध्ये दरोडा टाकत 21 कोटींचा ऐवज लुटला आहे. २० किलो सोनेही घेत दरडोखोरांनी महाराष्ट्राच्या दिशेने पालायन केले आहे.
कर्नाटक राज्यातील विजयपुरा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत मंगळवारी संध्याकाळी पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे.एकूण सुमारे २१ कोटी रुपयांची चोरी झाली असून यामध्ये १.०४ कोटी रुपये रोख रक्कम आणि २० किलो सोनं (सुमारे २० कोटी रुपये किमतीचे) यांचा समावेश आहे.
या दरोडेखोरांनी महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे.दरोडेखोरांनी लष्करी गणवेशासारखे कपडे घातले होते व तोंडावर मास्क लावले होते.मंगळवारी संध्याकाळी ६:३० ते ७:२० या वेळेत ही घटना घडली. या पाच दरोडेखोरांतील तीन जण बँकेच्या आत गेले आणि दोन जण बाहेर उभे राहिले. दरोडेखोरांनी बँकेतील मॅनेजर, कॅशिअर व इतर कर्मचाऱ्यांना हातातील शस्त्राचा धाक दाखविला आणि बँकेतील सोनं रोकड लुटण्यात आली.त्यानंतर दरोडेखोरांनी महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केले.
चार महिन्यांत घडलेली ही दुसरी घटना...
विजयपुरा जिल्ह्यातील गेल्या चार महिन्यांतील हा दुसरा मोठा बँक दरोडा आहे. याआधी २५ मे रोजी रोजी, विजयपुरा जिल्ह्यातील माणगुली गावातील कॅनरा बँकेत ५३ कोटींचे सोने आणि ५.२० लाख रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली होती.या प्रकरणात १५ आरोपींना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आता विजयपुरा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत मंगळवारी संध्याकाळी पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे.यात एकूण सुमारे २१ कोटी रुपयांची चोरी झाली असून यामध्ये १.०४ कोटी रुपये रोख रक्कम आणि २० किलो सोनं (सुमारे २० कोटी रुपये किमतीचे) यांचा समावेश आहे.
What's Your Reaction?