पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जेजुरी संस्थानने तिजोरी उघडली ; 1 कोटी 11 लाखांची मदत...

Oct 4, 2025 - 12:16
Oct 4, 2025 - 12:23
 0  240
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जेजुरी संस्थानने तिजोरी उघडली ; 1 कोटी 11 लाखांची मदत...

आय मिरर 

अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरी येथील खंडोबा देवस्थान कडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे. श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

या एक कोटी 11 लाख रुपयांमधून 51 लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला जाणारा असून उर्वरित रक्कम ही वस्तूंच्या स्वरूपात पूरग्रस्तांना मदत म्हणून केली जाणार आहे अशी माहिती श्री मार्तंड देव संस्थांचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली आहे.

यापूर्वीही श्री मार्तंड देव संस्थांनच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यात आली होती. सांगलीला पूर परिस्थिती आली होती त्यावेळी देवस्थानच्या वतीने अकरा लाख रुपये निधी देण्यात आला होता. कोरोना कालावधीत देखील श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने 51 लाख निधीची मदत ससून रुग्णालयाला करण्यात आली होती.अशी माहिती ही मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली.

श्री मार्तंड देव संस्थान हे कायम जनतेच्या भाविकांच्या मदतीसाठी सक्षम असते त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत आणि काम करत राहणार असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

आताही श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने एक कोटी अकरा लाख रुपये मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आली असून त्यापैकी 51 लाख रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहोत. तर उर्वरित रक्कम ही पूर भागातील जी गावे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत त्या गावांना वस्तू स्वरूपात मदत करणार आहोत असं ही घोणे यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow