"सरडेवाडीकरांची जागरूकता अन् इंदापूर पोलिसांची समयसूचकता" खंडाळ्यातून ट्रॅक्टर घेऊन फरार झालेला चोरटा इंदापुरात सापडला
आय मिरर
सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्येतून चोरी केलेला ट्रॅक्टर इंदापूर पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावर सरडेवाडी गावाच्या हद्दीत पकडला आहे. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी एकाला गजाआड केल असून दत्तात्रय जाधव असं आरोपीचे नाव आहे.सदर आरोपी हा अट्टल चोरटा असल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली असून सदर आरोपीला खंडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमाराला इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील काही जागरूक नागरिकांकडून इंदापूर पोलिसांना एक व्यक्ती पुणे सोलापूर महामार्गावरून ट्रॅक्टर घेऊन निघाली असून ती व्यक्ती इतर लोकांना वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने ट्रॅक्टर चालवत आहे त्यामुळे ती व्यक्ती संशयास्पद असल्याचा डायल 112 सेवेवर भ्रमणध्वनी आला होता.
यावरून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांसह पोलिस हवा.अक्षय गोफणे,पो.हवा.अमित यादव,पो.हवा.राजेंद्र काळे,पो. कॉन्स्टेबल नंदू जाधव,पो. कॉन्स्टेबल गोडगे,पो. कॉन्स्टेबल अनिल नागरगोजे,पो.कॉन्स्टेबल लक्ष्मण सूर्यवंशी,पो.कॉन्स्टेबल गिरी यांचे पथक तातडीने सरडेवाडी गावी पाठवले. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल असता तो मध्यपान केलेल्या अवस्थेत होता त्याच्या हालचाली संशयस्पद होत्या.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदरचा ट्रॅक्टर सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी करून आणल्याचं निष्पन्न झालं. शिवाय संबंधित व्यक्ती हा अट्टल चोरटा असल्याच ही पोलिसांनी म्हटल आहे. त्याने सातारा सोलापूर बीड या भागात चोऱ्या केली असल्याची शक्यता ही पोलिसांनी वर्तवली आहे.
इंदापूर पोलिसांनी खंडाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी ट्रॅक्टर चोरीबाबत गुन्हा नोंद असल्याची ही माहिती मिळाली. यानंतर खंडाळा पोलिसांनी पोलीस हवालदार नितीन महांगडे यांचं त्यांचे पथक इंदापूर पोलीस ठाण्याला पाठवले. संबंधित आरोपीला खंडाळा पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सांगितले आहे.
What's Your Reaction?