सख्या भावनेचं काढला मोठ्या भावाचा काटा ! कारण काय ? पोलिसांकडून 24 तासात आरोपी गजाआड

Aug 3, 2025 - 16:41
Aug 3, 2025 - 16:41
 0  2830
सख्या भावनेचं काढला मोठ्या भावाचा काटा ! कारण काय ? पोलिसांकडून 24 तासात आरोपी गजाआड

आय मिरर 

भावा भावांच्या नात्याला काळीमा फासणारी थरारक घटना पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीकच्या मावडी गावात घडली आहे.शेत जमिनीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या 82 वर्षीय मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलाय. ज्ञानदेव लक्ष्मण भामे असं खून झालेल्या मोठ्या भावाचं नाव असून आरोपी चांगदेव लक्ष्मण भामे याला जेजुरी पोलिसांनी 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

एक ऑगस्ट रोजी मयत ज्ञानदेव भामे यांचा मृतदेह बाजरीच्या शेतामध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा मृत्यू नैसर्गिक असावा असे वाटत होते. मात्र, पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या आणि चौकशीतून ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

नेमकं काय घडलं ?

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळच्या सुमारास एका बाजरीच्या शेतात ज्ञानदेव लक्ष्मण भामे यांचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा मृत्यू नैसर्गिक असावा असा अंदाज होता. मात्र, पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला.तेव्हा पोलिस तपासात खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

दोघा भावांमध्ये घरगुती मालमत्तेवरून वाद होते.त्यातूनच ही हत्या झाल्याचं पोलिस तपासात समोर आलं.मयत ज्ञानदेव भामे आणि आरोपी भाऊ चांगदेव भामे यांच्यात शेताच्या वाटपावरून वाद सुरू होता. मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता देत नव्हता. वहिवाटीचा रस्ता अडवून तो त्रास देत होता त्यामुळे त्याला लाथा बुक्क्या आणि दांडक्याने मारहाण केल्याचं आरोपी चांगदेव भामे यांनी पोलिसांना सांगितले.

 

शवविच्छेदन अहवालात देखील मयत भामे यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.यानंतर पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow