महिलेवर जबरदस्तीने अत्याचार,दौंड पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Aug 7, 2025 - 15:46
Aug 7, 2025 - 15:52
 0  867
महिलेवर जबरदस्तीने अत्याचार,दौंड पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

आय मिरर 

दौंड तालुक्यातील माळेवाडी लिंगाळी येथे एका महिलेवर दोघांनी जबरदस्तीने अत्याचार केलाय. तर अन्य तीन व्यक्तींनी या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याची तक्रार दौंड पोलिसात दाखल करण्यात आलीय.पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राजु काळे,संदीप राजु काळे,सुरज भावड्या पवार,निलेश जितेंद्र चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास दौंड तालुक्यातील माळेवाडी लिंगाळी येथे ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळपावर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow