इंदापूर हादरलं ! 35 वर्षीय विवाहितेची हत्या, वाचा नेमकं काय घडलं...
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील ३५ वर्षीय विवाहित महिलेचा खून करण्यात आलाय.मनीषा मल्हारी खोमणे असे मृत महिलेचे नाव असून,तिचा पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने डोक्यात जोरदार प्रहार करून तिची हत्या केल्याचा संशय वालचंद नगर पोलिसांना असून वालचंद नगर पोलिसांची पथके संशयित आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे यांच्या शोधात आहेत.
आज मंगळवारी 23 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.पहाटे साडेपाचच्या सुमारास मनीषा खोमणे या अंघोळीसाठी जात असताना पतीने पाठीमागून डोक्यात जोराचा वार केला. या हल्ल्यात त्या जागीच कोसळून मृत्यूमुखी पडल्या. यानंतर आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे फरार झाला आहे.त्याच्या शोधासाठी वालचंदनगर पोलिसांची पथके माळेगाव, जेजुरी, नातेपुते तसेच इतर परिसरात रवाना करण्यात आली आहेत.
संशयित आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे याच्यावर यापूर्वीही वालचंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती ही आता समोर आली आहे.
नेमकं काय घडलं...
आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मनीषा खोमणे या अंघोळीसाठी जात असताना पतीने पाठीमागून डोक्यात जोराचा वार केला. या हल्ल्यात त्या जागीच कोसळून मृत्यूमुखी पडल्या. त्यानंतर त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक रथीलाल चौधर, पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे व पोलीस कर्मचारी गुलाब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला आहे.
What's Your Reaction?