सुपे पोलिसांकडून चौघांवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई

Sep 25, 2026 - 07:39
Sep 25, 2026 - 07:41
 0  243
सुपे पोलिसांकडून चौघांवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई

आय मिरर 

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांनी चौघा जणांना दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व हवेली तालुक्यासह सातारच्या फलटण तालुक्याच्या बाहेर आणि पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयतालयाच्या हद्दीतून तडीपार केलं आहे.

वैभव तुकाराम शेलार, किरण मारुती गायकवाड, अनिकेत प्रदीप काळे आणि अमोल पोपट गायकवाड या चौघांविरोधात ही कारवाई करण्यात आली असून हे चौघेही बारामती तालुक्यातील रहिवासी आहेत.

सुपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. सुपे पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या याचा वनविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपारची कारवाई करण्यात आली.

या संदर्भात सोपा पोलीस ठाण्याकडून हद्दपारचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आला होता.21 सप्टेंबर 2026 रोजी या संदर्भातील आदेश पारित करण्यात आला.

सदर व्यक्तींना २४ महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व हवेली तालुके, तसेच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह, तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका या हद्दीबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून संबंधित हद्दीत प्रवेश केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे सोपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी सांगितलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow