पंढरपूरला पूरस्थिती ! मंदिरांना पाण्याचा वेढा, उजनीतून भीमेत 91 हजार 600 क्युसेकने विसर्ग तर नीराही दुथडी भरून वाहू लागली
आय मिरर
पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी सहा वाजलेपासून 76, 600 क्युसेक इतका विसर्ग नदीत सोडण्यात येत होता. याच विसर्गात आता सकाळी साडेनऊ वाजता वाढ करण्यात आली असून तो 91 हजार 600 इतका करण्यात आला आहे.
तर निरा खोऱ्यात ही मोठा पाऊस होत असल्याने वीर धरणाच्या वरील साखळीतील सर्व धरणांमधून विसर्ग केला जातोय या सर्व धरणांमधून येणारा पाणी वीर धरणात येत असल्याने वीर धरणा मधून निरा नदी पात्रात 54000 क्युसेक इतक्या दाबाने पाणी सोडलं जातय. त्यामुळे नीरा आणि भीमा नदीच्या नरसिंहपूर येथील संगमामधून पंढरपूर कडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह आता 1 लाख 45 हजार क्युसेक इतका झाला आहे.
सद्यस्थितीला पंढरपूर येथील वाळवंटा मधील असणारी सर्व मंदिरांना पाण्यांना वेडा टाकला आहे. भीमा नदीतून येणारा प्रवाह वाढला असल्याने पंढरपूरमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे.तर अधिकच्या पावसामुळे उजनी धरणाचा विसर्ग आज दुपारपर्यंत एक लाख क्युसेकच्या अधिक जाऊ शकतो. असा प्राथमिक अंदाज देखील व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं भीमा आणि नीरा नदी काठाच्या दोन्ही गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूरच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. उजनी आणि वीर धरणातून सध्या पंढरपुरात एक लाख 31 हजार क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित होत आहे. तर पुन्हा एकदा पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशातच पंढरपुरातील वाळवंटातील भक्त पुंडलिकासाठी इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिलाय.
निरा दुथडी भरून वाहू लागली...
नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असून, वीर धरणातून नीरा नदी पात्रात 54 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे.त्यामुळे नीरा नदी काठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नीरा शहरानजीक असलेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारी सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला जुना ब्रिटिशकालीन पूल पाणी खाली गेला आहे. तर ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते तेथील दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे.
नीरा नदी काठच्या गावांमध्ये आता पूरस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभागाने निरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास आणखी पाणी सोडलं जाऊ शकतं असं देखील पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आल आहे.
दौंडच्या खामगाव दहिटणे भागातील जुन्या बंधार्यावरून वाहू लागलं पाणी...
धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने मूळा मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे.दौंड तालुक्यातील खामगाव दहिटणे भागातील जुन्या बंधार्यावरून पाणी वाहत असल्याचे दिसत आहे.प्रशासनाकडून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
What's Your Reaction?