BARAMATI जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांविरोधात गुन्हा दाखल, माळेगांव पोलिसांकडून घेतला जातोय शोध
आय मिरर
दोन दिवसापूर्वी पुणे जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगताप यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.पुण्यातील बंड गार्डन पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तो गुन्हा बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ मंगेश जगताप यांचा शोध घेत आहेत.
मंगेश जगताप याच्यावरती लग्नाचे आम्हीच दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे शिवाय आर्थिक फसवणूक केल्याचा देखील आरोप आहे.
मंगेश जगताप आणि संबंधित तरुणीचे 2007 पासून प्रेम संबंध होते.दरम्यान मंगेश जगताप याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला, आर्थिक फसवणूक केली असा या तरुणीचा आरोप आहे.
मंगेश जगताप हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पणदरे जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तो निवडून आला होता. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणावरून संबंधित तरुणीने पुण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता आणि यामुळे संपूर्ण राज्य एकच खळबळ उडाली होती.
What's Your Reaction?