इंदापूर पोलिसांकडून बिहारी बाबुला बेड्या ; गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे जप्त

Aug 4, 2026 - 06:58
Aug 4, 2026 - 07:01
 0  287
इंदापूर पोलिसांकडून बिहारी बाबुला बेड्या ; गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे जप्त

आय मिरर 

इंदापूर पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत एका तरुणाला गावठी पिस्टलसह अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझीन असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी हा बिहार राज्यातील असून इंदापूर परिसरात पंक्चर दुकान चालवत होता. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

मोहम्मद कमरुल हलीम मन्सुरी (वय २५), रा. मूळ वैशाली (बिहार), सध्या गोवळी सोनाई डेअरीसमोर, ता. इंदापूर, जि. पुणे, हा अवैध गावठी पिस्तूल बाळगत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.

पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन हस्तगत करण्यात आले. त्यानंतर आरोपीविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ५८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत गणेश केकाण, हवालदार संतोष शिंदे, विनोद रासकर तसेच पोलिस अंमलदार विनोद लोखंडे, मोहन आनंदगावकर, लक्ष्मण सूर्यवंशी, योगेश कर्चे, राहुल शिंदे, सौरभ पाटील, सागर क्षिरसागर, अंकुश माने, नंदू जाधव आदींनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि गणेश केकाण करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow