रूममेटनेच गळा दाबला,मित्राचा खून करून मृतदेह पोत्यात भरला ! शिक्रापूर पोलिसांनी उलघडवलं पोत्यातील मृतदेहाचे गूढ
आय मिरर
शिक्रापूर येथील करंजेनगर येथील मोकळ्या मैदानातील झुडपात पोत्यामध्ये आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहामागील खुनाचे गूढ पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडले आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच मित्राचा गळा दाबून खून केल्याच आणि पुरावे लपविण्यासाठी पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून निर्जन झुडपात फेकल्याच धक्कादायक सत्य तपासात समोर आलं असून पोलिसांनी आरोपींना गजाआड केल आहे.
२४ ते २६ जुलै दरम्यान घडलेल्या या घटनेत गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा.थेऊर, ता.हवेली) याचा निर्घृण खून करण्यात आला. २६ जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील मैदानातील झुडपात पोत्यात भरलेला मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृताची ओळख पटत नसल्याने शिक्रापूर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित करण्यात आली, तर गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.
अखेर मृताची ओळख गौरव उर्फ अक्षय वायकर अशी पटली. तपासादरम्यान गौरव हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे (वय १९) व त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत राहत असल्याची माहिती समोर आली.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयातून मुकेशने गौरवचा गळा दाबून खून केल्याची, तसेच मृतदेह पोत्यात भरून झुडपात टाकण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक कबुली जान्हवी ने दिली.
मयताची आई कांचन अशोक वायकर यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख, उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, तुषार भोर तसेच शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वेगवान तपास करत आरोपींना जेरबंद केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करीत आहेत.
सदर ची कारवाई शिकापुर पोलीस स्टेशन चे सपोनि शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख, पोउपनि उमांकात कुंजीर, तुषार भोर, अंकुश कारंडे, ग्रेड पोसई जितेंद्र पानसरे, पोहवा संदीप इथापे, पोहवा रोहीदास पारखे, अमोल दांडगे, चंद्रकात काळे, संदीप करांडे, पोअ संतोष बाबर, नारायण वाळके, मच्छिंद्र निचीत, ललीत चकनारायण, राहुल गडदे, भारत भोसले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रा. पथकाचे पोसई महेश डोंगरे, पोहवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, विकास पाटील व पोअ सागर धुमाळ पोलीस पथकाने केलेली आहे. शिक्रापूर येथील आपदा टिमचे शेरखान शेख यांनी मदत केली.
What's Your Reaction?