अंत्यविधीसाठी गेलेल्या प्रवाशांवर परतीच्या वाटेत काळाचा घाला ; एकाचा मृत्यू तर १३ जण जखमी...
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील मौजे लोणी देवकर गावच्या हद्दीत आज पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. एका क्लुझर जीपने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात कर्नाटकातील यल्लावा चौंडकी या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून १३ प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींना भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटल सह इंदापूरमधील शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रवासी काल पुण्यामध्ये एका ठिकाणी अंत्यविधीसाठी गेले होते.अंत्यविधी उरकल्यानंतर मध्यरात्री ते परत आपल्या गावाकडे कर्नाटकातील विजापूर कडे निघाले होते.
दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या परिसरात आज पहाटे पावणेचार वाजता गाडी चालक श्रीकांत कुलगैरी याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि या गाडीची पुढील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक बसली.
या भीषण अपघातात प्रवाशांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य 13 जण हे गंभीर आणि किरकोळ जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर आणि पोलीस मदत केंद्राचे इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. इंदापूर मधील काही तरुणांच्या मदतीने आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आलं. काही जखमींना भिगवण येथील लाईफ लाईन हॉस्पिटल तर काहींना इंदापूर मधील उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचारकामी दाखल करण्यात आलं आहे.
कोण कोण जखमी...
- सागर गणपती जानकर वय २७ वर्षे पुरुष (गंभीर जखमी)
- परशु संगप्पा जानकर वय ३० वर्षे पुरुष (गंभीर जखमी)
- महादेवी दोहमणी वय ६० वर्षे महीला (गंभीर जखमी)
- रेणका अनिल परानवर वय ४० वर्षे महीला (किरकोळ जखमी
- रामक्का गणपती जानकर वय ५० वर्षे महीला (गंभीर जखमी
- लक्ष्मी परशु परानवर वय ३५ वर्षे महीला (किरकोळ जखमी)
- सुसलवा जानगर वय ६८ वर्षे महीला (किरकोळ जखमी )
- मुत्ववा परानवर वय ६० वर्षे महीला (गंभीर जखमी)
- सुनंदा परानवर वय ५० वर्षे महीला (गंभीर जखमी)
- सविता भिमु परानवर वय ३५ वर्षे महीला (किरकोळ जखमी
- सित्तवा परानवर वय ७० वर्षे महीला (किरकोळ जखमी)
- श्रीकांत कुलगैरी वय ३० वर्षे (चालक गंभीर जखमी)
- गौरवा यलप्पा मनगोळी वय ५५ वर्षे महीला (किरकोळ जखमी)
What's Your Reaction?