पुण्यात संततधार ! उजनीत येणारी आवक वाढली, भीमा नदी पात्रात 6600 क्युसेकने विसर्ग सुरू....

Aug 19, 2025 - 13:03
Aug 19, 2025 - 13:26
 0  348
पुण्यात संततधार ! उजनीत येणारी आवक वाढली, भीमा नदी पात्रात 6600 क्युसेकने विसर्ग सुरू....

आय मिरर 

पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असून उजनी धरण साखळीतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणाच्या सहा दरवाजांमधून भीमा नदी पात्रात आज दुपारी बारा वाजल्यापासून 6 हजार 600 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग केला जातोय. 

वरील येव्यानुसार यामध्ये कधी अधिक वाढ केली जाऊ शकते त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. 

सद्यस्थितीला उजनी धरण 104 पूर्णांक 80 टक्के क्षमतेने भरले असून उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 119 पूर्णांक 80 टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी इतकी आहे.

सध्या पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असून खडकवासला सह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. उजनीच्या धरण साखळीतील वरील धरणे जवळपास आता भरत आली आहेत त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला जातोय.

परिणामी उजनी धरणात येणारी आवक वाढत असल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरण व्यवस्थापनाने दुपारी बारा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कमी अधिक प्रमाणात वाढ केली जाऊ शकते त्यामुळे नदी काठाच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow