गुरोळीतील तरुणाला अमानुष मारहाण, नरड्याला कोयता लावत केले नग्न : चौघांविरोधात गुन्हा दाखल
आय मिरर
गुरोळी (ता. पुरंदर) – तालुक्यातील गुरोळी गावात अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादावरून एका तरुणाला कोयत्याने मारहाण करत नग्न करून त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सासवड पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा घडला प्रकार...
रविवार (दि. १७ ऑगस्ट) रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दीपक रामचंद्र खेडेकर हा बैलाला चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेला होता. त्यावेळी सुनिल रामचंद्र खेडेकर याचा फोन आला आणि त्याला पोल्ट्रीवर बोलावून घेण्यात आले. तिथे आधीच आरोपी विराज कोलते व मयांक कोलते यांना मारहाण करत होते.
दीपक खेडेकर याने मारहाण का करता? अशी विचारांना केली व मारहाणीचा व्हिडीओ शूटकरण्यासाठी मोबाईल काढताच आरोपींनी त्याचा मोबाईल हिसकावून घेताला. त्यानंतर चौघांनी मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी, दांडक्याने व काठीने बेदम मारहाण केली. एवढ्यावर न थांबता सुनिल खेडेकर याने कोयत्याने डोक्यात वार केला व धमकी देत कपडे काढून तरुणाला नग्न केले. त्याचा व्हिडीओ काढत, “कोणाला सांगितले तर हा व्हीडीओ व्हायरल करू” अशी धमकी दिली.
आरोपी कोण ?
या प्रकरणी सुनिल रामचंद्र खेडेकर,रामचंद्र यशवंत खेडेकर आनंद रामचंद्र खेडेकर,गौरव भाऊसो खेडेकर (सर्व रा. गुरोळी, ता. पुरंदर) यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची कारवाई...
जखमी अवस्थेत संतोष खेडेकर व मंगेश खेडेकर यांनी दीपक याला तात्काळ सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सासवड पोलीसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण...
या अमानुष मारहाणीच्या प्रकारामुळे गुरोळी व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नग्न करून व्हिडीओ शूट करण्यासारखा संतापजनक प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
What's Your Reaction?