वाहनांना अडवून दमदाटीनं पैसे उकळणं त्यांना महागात पडलं ! यवत पोलिसांनी दाखवला थेट जेल चा रस्ता

Sep 9, 2025 - 17:26
Sep 9, 2025 - 17:29
 0  932
वाहनांना अडवून दमदाटीनं पैसे उकळणं त्यांना महागात पडलं ! यवत पोलिसांनी दाखवला थेट जेल चा रस्ता

आय मिरर 

पुणे सोलापूर महामार्गावर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाखारी येथे प्रवासी वाहनांना खाजगी एजंट असल्याचे सांगत वाहनांची अडवणूक करून गाडीवर कर्ज असल्याचे सांगत दमदाटीने 25 हजारांची जबरदस्तीने लूट करणाऱ्या दोघा खंडणीखोरांना यवत पोलिसांनी गजाआड केलं आहे तर अन्य दोघांचा यवत पोलिसांकडून शोध घेतला जातोय. 

तुषार दत्तात्रय शेळके वय २४ वर्षे आणि रोहित गोविंद कड, वय ३३ वर्षे अशी अटक केलेल्या दोघा संशयतांची नावे असून हे दोघेही दौंड तालुक्यातील रहिवासी आहेत. 

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आणि 15 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास केडगाव चौफुला या गावाजवळ वाखरी येथे पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांच्या गाडीवर कर्ज असल्याचे सांगून प्रवाशांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांच्याकडून काही रक्कम जबरदस्तीने वसूल केली होती. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मधुसूदन हिरा सदाफुले यांनी तक्रार दाखल केली होती.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मधुसूदन हिरा सदाफुले वय ६० वर्षे हे त्यांचे कुटूंबासोबत पुण्याच्या दिशेने निघाले होते.या दरम्यान वाखारीजवळ पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची चारचाकी कार क्रमांक MH12 NP 0728 आणि राखाडी रंगाची स्विप्ट चारचाकी कार क्रमांक MH 12 KY 6352 मधील तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी सदाफुले यांची टोयोटा कंपनीची इनोवा वाहन क्रमांक MH 13 BN 9559 अडवली. 

सदर गाडीवर कर्ज असल्याचे सांगून सदाफुले यांचेसोबत पत्नी व मुलगी असताना त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे अश्लील भाषेत शिवीगाळ व हावभाव करून २५,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने देण्यास भाग पाडले.

त्यापैकी एका व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करून तुमचे वाहन अडविण्याचा प्रकार माझ्याच माणसांनी केलेला आहे. ते जाऊ द्या तुम्ही प्रकरण वाढवू नका, पोलीसात तक्रार करू नका, अशी धमकी दिली होती.

यानंतर यवत पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने खोलवर तपास करीत संशयित आरोपी तुषार दत्तात्रय शेळके, वय २४ वर्षे, रा. शेळकेवस्ती वाखारी ता. दौंड आणि रोहित गोविंद कड, वय ३३ वर्षे, रा. स्टेशन रोड, यवत ता. दौंड यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. यवत पोलिसांनी या दोघांनाही अटक केलेली आहेत.

याशिवाय सदर पुण्यामध्ये वापरलेली पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची ब्रिजा चारचाकी MH 12 NP 0728 ही हस्तगत करण्यात आलेली आहे. तर आणखी एका वाहनाचा आणि इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने हे करित आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक सागर माने,अक्षय मोरे, गोविंद भोसले, सहाय्यक फौजदार शिंदे, पो. हवा. गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, संदीप देवकर, दत्ता काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ, बाळासो चोरमले, गणेश सोनवणे, प्रमोद गायकवाड, सचिन साळुंखे, वैभव भापकर, पो.कॉ. मारूती बाराते, विनोद काळे, अमोल भुजबळ, विशाल गवारी, सचिन काळे, शुभम मुळे, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow