बिग ब्रेकिंग | मध्यरात्री अचानक आग 17 दुचाकी जळाल्या ! दौंडच्या लिंगाळीत भयानक घडलं
आय मिरर
दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंट परिसरात मध्यरात्री भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीत तब्बल 17 दुचाकी जळून खाक झाल्या असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास ही आगीची घटना घडली. अपार्टमेंटच्या पार्किंग भागात काही दुचाकी लावलेल्या होत्या. अचानक आगीचा भडका उडाला आणि यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 17 दुचाकी जळून खाक झाल्या.
आग लागल्याची घटना समजतात रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे लोट एवढे मोठे होते की या घटनेत एक-दोन नाही तर 17 दुचाकी जळून खाक झाल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या आगी मागील नेमकं कारण काय असावं याचा शोध आता घेतला जातोय.
What's Your Reaction?