त्या पोलिसांवर कारवाई करा ; सासवड मध्ये नोंदवला निषेध

Aug 7, 2025 - 16:07
 0  672
त्या पोलिसांवर कारवाई करा ; सासवड मध्ये नोंदवला निषेध

आय मिरर 

पुण्याच्या सासवड येथील शिवतिर्थ चौकात आरपीआय आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन मागासवर्गीय मुलींना जातीवाचक शब्द वापरून अपमानित केलं.बेकायदा पोलीस स्टेशन मध्ये नेहून त्यांचे शोषण केलं.त्या घटनेतील पोलीस अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

त्याचं बरोबर "संविधान का बदलावे' या पुस्तकाचे प्रकाशन करणारे लेखक एडवोकेट शिवाजी कोकरे, त्यांना सहकार्य करणारे मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली.

सातत्याने संविधान आणि राष्ट्रध्वज याच्या विषयी सतत चुकीचे आणि अपमानकारक बोलणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे जन सुरक्षा विधेयक रद्द करावे.या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी याबाबतच्या मागणीच पत्र पोलिसांकडे देण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow