Indapur Election वसंतराव मालुंजकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची मागणी...

Nov 2, 2025 - 23:13
Nov 2, 2025 - 23:26
 0  992
Indapur Election वसंतराव मालुंजकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची मागणी...

आय मिरर 

इंदापूर शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वसंतराव मालुंजकर यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ट नेत्यांकडे उमेदवारीची मागणी देखील केली आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करणार का ? आणि निष्ठावान कार्यकर्त्याला ते संधी देणार का असा ही प्रश उपस्थित झाला आहे.

इंदापूर नगरपरिषदेची गेल्या तीन साडेतीन वर्षापासून रखडलेली निवडणूक आता पार पडत असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून अनेक प्रबळ चेहरे दावेदार आहेत.त्यापैकी एक असणाऱ्या वसंतराव मालुंजकर यांनी पक्षाकडे थेट उमेदवारीची मागणी केली आहे.

पक्षाचे नेते जो आदेश देतील तो शिरसावंद्य मानून मी पक्षासाठी काम करीत आलो आहे.माझ्या पत्नीला मागील निवडणुकीत नगसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे आम्ही सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे.मात्र त्या ही पलीकडे शहराच्या विकासासाठी देखील आमचा सक्रीय सहभाग राहिला असून पक्षा प्रति जपलेली निष्ठा आणि केलेल्या कामाच्या जोरावर उद्याच्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची मी स्वतः पक्षाकडे उमदेवारी मागितली असल्याचे मालुंजकर यांनी सांगितले.

माझ्या मागणीचा पक्ष आणि वरिष्ठ नेते नक्की सकारात्मक विचार करतील.इंदापूर शहर एका वेगळ्या उंचीवर पोहचवण्याचा माझा मानस असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहराचा कायापालट नक्कीच केला जाईल असा विश्वास ही वसंतराव मालुंजकर यांनी व्यक्त केला आहे.

मालुंजकर म्हणाले की माझं आणि इंदापूर शहराचं नातं हे गेल्या चाळीस वर्षापासूनच आहे.बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून व्यवसायाबरोबर समाजाचे ही काम करत आलोय.इंदापूर नगरपरिषदेच्या माझ्या पत्नीने हेमलता मालुंजकर हिने दोन निवडणुका लढवल्या,एका वेळी अपयश आले मात्र 2017 च्या निवडणुकीत आम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.यासोबतच शहराच्या विकासकामात देखील आमचा सक्रीय सहभाग होता.

माझ्या इंदापूर मधील चाळीस वर्षाच्या कालखंडापैकी जवळपास मी तीस वर्षे पक्षाचे काम केले असून ते एकनिष्टने केले आहे.लोकसभा, विधानसभा किंवा नगरपरिष निवडणुकात मी स्वतःहून शहरात पक्ष पुढे नेण्याचे काम केले.प्रत्येक निवडणुकात सर्वांना सोबत घेऊन माझा सहभाग राहिला आहे.

गेल्या पंधरा वर्षाखाली जेव्हा राष्ट्रवादीकडे नगरपरिषदेची सत्ता होती तेव्हा इंदापूर शहराला तरंगवाडी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता.नंतर सत्ता बदल झाला आणि मोठ मोठ्या योजना झाल्या. आज हे म्हणत आहेत की इंदापूर शहराला तरंगवाडी तलावातून पाणी द्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा बदल झाला आहे.त्यामुळे शहराला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय असा आरोप ही वसंतराव मालुंजकर यांनी केला आहे.जर आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर शहराला आपण तरंगवाडी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नक्की करू अस ही ते म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow