"इथे कायदा पाळावाच लागेल" इंदापूरचा पदभार स्वीकारताचं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे ॲक्शन मोडवर

Jan 7, 2024 - 20:06
Jan 7, 2024 - 20:19
 0  2400
"इथे कायदा पाळावाच लागेल" इंदापूरचा पदभार स्वीकारताचं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे ॲक्शन मोडवर

आय मिरर

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची राजगड पोलीस ठाण्याला बदली झाल्यानंतर इंदापूरच्या पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी स्वीकारला. इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सूर्यकांत कोकणे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले.पदभार स्वीकारताच सूर्यकांत कोकणे यांनी रविवारी दि.०७ जानेवारी रोजी सायंकाळी इंदापूर शहरातून आणि आठवडे बाजारातून पेट्रोलिंग करीत बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करीत इंदापूरच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांसह पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 65 केसेस मधून 48 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे.

तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाल्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणारा अधिकारी कसा असेल? वाढत चाललेली गुन्हेगारी,अवैद्य व्यवसाय यासह इंदापूर शहरातील महत्त्वाचा असणारा बेशिस्त पार्किंग अशा विविध विषयावर लक्ष केंद्रीत करणार का? असे अनेक प्रश्न तारांकित झाले होते. त्या दृष्टीने पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या सर्व बाबींसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून देत इंदापूर शहरात कायद्याचं पालन करावे लागेल आणि कायदा पायदळी तुडवणारांना कायदेशीर कारवाईचा सामना करावाचं लागेल असा निर्वानीचा इशाराच दिला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांसह पोलीस उपनिरीक्षक गरड, ए.एस.आय.बालगुडे, पो.काॅ.नरळे, पो.हवा. रासकर ,पो.काॅ.नागरगोजे, पो.काँ.आरणे, पो.काॅ.कदम, पो.काॅ.खाडे, पो.काँ. वाघमारे, पो.काॅ.चोरमले, पो.काॅ.शिंदे, पो.काॅ.वानवळे, पो.काॅ.शेख, पो. काॅ.आनंदगावर, पो.काॅ. फडणीस आणि पो.काॅ.नेवसे यांच्या पथकाचा सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow