माझ्या बापाला पावणेदोन लाख रुपये पेन्शन दहा-वीस लाख टाकून मोकळा होतो,सोशल मीडियावर इंदापूर भूमी अभिलेख मधील अधिकाऱ्याच्या व्हिडिओने खळबळ

Jan 20, 2026 - 13:50
Jan 20, 2026 - 14:08
 0  1546
माझ्या बापाला पावणेदोन लाख रुपये पेन्शन दहा-वीस लाख टाकून मोकळा होतो,सोशल मीडियावर इंदापूर भूमी अभिलेख मधील अधिकाऱ्याच्या व्हिडिओने खळबळ

आय मिरर 

इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित अधिकारी पुढील व्यक्तीसोबत अरेरावीची, अवमानकारक आणि वादग्रस्त भाषा वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.व्हिडिओत शासकीय बोलणारी व्यक्ती ही मुख्यालय सहाय्यक भूमी अभिलेख असल्याची माहिती समोर येत आहे. 

व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी अधिकारी स्वतःची आर्थिक व सामाजिक ताकद सांगत दबाव टाकताना दिसत आहेत. माझ्याकडे भरपूर जमीन आहे... मी खानदानी मोठा आहे.. पैसा पाण्याने भरपूर आहे.. दहा-वीस लाख रुपये टाकून मोकळा होतो” अशा प्रकारची वक्तव्ये करत ते आपली संपत्ती आणि पैशांची ताकद मिरवत असल्याचे ऐकू येते.

तसेच 75 एकर बागायत जमीन आहे...ऊस, बागायत सगळं आहे... मी पगारी नोकरीसाठी काम करत नाही, हौसेने काम करतो..याचबरोबर.. माझ्या बापाला पावणेदोन लाख रुपये पेन्शन आहे... साहेबांना कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही घाबरत नाही...माझ्या विरोधात काय करायचं ते करा... अशा धमकीवजा वक्तव्यांमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाची पद्धत, अधिकाऱ्यांची भाषा आणि सामान्य नागरिकांशी होणारी वागणूक यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, हे संपूर्ण प्रकरण काय होतं याची अद्याप पर्यंत माहिती मिळू शकली नाही. संबंधित अधिकारी महोदय पुढील व्यक्तीवर एवढे का संतापले होते ? त्याची नेमकी कारण काय आहेत ? आणि पुढील व्यक्तीने नेमकी काय तक्रार केली होती याचीही माहिती अद्याप पर्यंत मिळू शकलेली नाही.

या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे चौकशीचे आदेश लावणार का ? आणि अशा अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow