खंडेरायांच्या चरणी भक्ताकडून 11 किलो चांदीचा त्रिशूळ अर्पण,तब्बल इतकी आहे किंमत
आय मिरर
श्री खंडोबा देवाच्या नवरात्र उत्सवाला भाविक भक्तांकडून नेहमीच वेगवेगळ्या भेटवस्तू अर्पण होत असतात. यावर्षीही अशाच एका भक्ताने श्री खंडेरायाच्या चरणी तब्बल १६ लाख रुपये किंमतीचा 11 किलो वजनाचा चांदीचा त्रिशूळ अर्पण केला आहे.
थेऊर येथील मल्हार भक्त सुजित तात्यासाहेब काळे यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ११ किलो वजनाचा आणि तब्बल १६ लाख रुपये किंमतीचा चांदीचा त्रिशूळ श्री खंडेरायाच्या चरणी अर्पण केलाय.
यावेळी मार्तंड देवसंस्थानच्या वतीने भक्त सुजित काळे यांचा सन्मान करण्यात आला.
तर यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांच्यासह रांका ज्वेलर्सचे नरेश ठाकूर, हनुमंत लांघी, मल्हार बारभाई, सागर गोडसे, दादा खोमणे तसेच सर्व सेवेकरी व पुजारी वर्ग उपस्थित होते.
What's Your Reaction?