INDAPUR निवडणुकीपूर्वीच मंत्री दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचे तीन शिलेदार फोडले ; आज दादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Oct 29, 2025 - 08:55
Oct 29, 2025 - 09:04
 0  2590
INDAPUR निवडणुकीपूर्वीच मंत्री दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचे तीन शिलेदार फोडले ; आज दादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

आय मिरर 

आगामी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापूर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टिन हॉटेलमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी दहा वाजता हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.या पक्ष प्रवेशामुळे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांना दत्तात्रय भरणे यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वीच धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे.

इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हर्षवर्धन पाटील मोटर वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राऊत आणि माजी नगरसेवक गोरख शिंदे हे तीन स्थानिक नेते हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. 

हा पक्षप्रवेश म्हणजे इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय.अर्थात हा प्रवेश इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती फलदायी ठरेल हे पाहण ही महत्वाचे असणार आहे.

इंदापूर मध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात...

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केले त्यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरून महाविकास आघाडी मधून काँग्रेसला रामराम ठोकत हर्षवर्धन पाटील बाहेर पडले आणि त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यानंतर 2019 ची विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या कमल चिन्हावर लढवली मात्र यातही दत्तात्रय भरणे यांच्याकडून हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. 

यानंतर 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरची जागा ही माहितीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच सत्ताधारी आमदाराच्या वाटेला गेली त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना नाईलाज असतो भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करावा लागला मात्र त्या ठिकाणीही सलग तिसऱ्यांदा दत्तात्रय भरणे यांकडून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला.

हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय सत्ता संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून होऊ घातलेल्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर मध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार दत्तामामांनी आपल्या गळाला लावले आहेत. मात्र याचा उद्याच्या होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कितपत परिणाम होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow