वालचंदनगर पोलीस ठाण्याला ISO मानांकन तेरा जणांवर मोक्का,राजकुमार डुणगेंच्या कारकिर्दीचा जिल्ह्यात डंका

Aug 16, 2025 - 07:43
Aug 16, 2025 - 07:45
 0  1116
वालचंदनगर पोलीस ठाण्याला ISO मानांकन तेरा जणांवर मोक्का,राजकुमार डुणगेंच्या कारकिर्दीचा जिल्ह्यात डंका

आय मिरर 

इंदापूर आणि सोलापूरच्या माळशिरस परिसरात दहशत पसरवणाऱ्या इंदापूर तालुक्यातील 13 जणांवर वालचंदनगर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार राजू भाळे यांच्यासह तब्बल 13 जणांना विरोधात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजकुमार डुणगे यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

वालचंदनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला पासूनच पोलीस अधिकारी राजकुमार डुणगे यांनी संघटित गुन्हेगारी मोडून काढल्यावर आपला भर दिल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्यानंतर राजकुमार डुणगे यांनी गुन्हेगारांचं कंबरडं मोडलंय.

सासवड येथील बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचा असणारा तिसरा आरोपीही वालचंद नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून तो पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देत राजकुमार डुणगे यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा दाखवून दिला.अगदी पहिल्या दिवसापासूनच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले राजकुमार डुणगे आता इंदापूर तालुक्यातील 13 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याने सर्वसामान्यांच्या नजरेत हिरो ठरले आहेत. 

वालचंद नगर पोलिसांच्या कारकिर्दीची चर्चा पारा पारावर रंगत असून यातून पुणे ग्रामीण पोलीस दलात वालचंदनगर पोलिसांच्या कार्याचा आलेख उंचावला गेलाय हेच सिद्ध होते. अशातच वालचंद नगर पोलीस ठाण्याला आय.एस.ओ 9001-2015 मानांकन दर्जा प्राप्त झाला असून यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात वालचंदनगर पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस स्टेशन होण्याचा मान मिळाला आहे. नुकतेच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या हस्ते वालचंद नगर पोलिसांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

आय.एस.ओ दर्जा मिळालेले वालचंदनगर जिल्हामधील दुसरे पोलीस ठाणे...

आय.एस.ओ स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकनासाठी आवश्यक असलेल्या 37 निकषांतील नियम, अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केल्यामुळे इंदापुर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनला आय.एस.ओ 9001-2015 सर्टिफाईड स्मार्ट पोलीस स्टेशन श्रेणी अ++ (ISO 9001-2015) Certified SMARAT police station With Grade A++ मिळाला आहे. सोलापुर येथील संस्थेने केलेल्या पाहणीनुसार पोलीस स्टेशनला 100 पैकी 93 मार्क मिळाले आहेत. नवीन निकषानुसार स्मार्ट पोलीस स्टेशनचा आय.एस.ओ दर्जा मिळालेले पुणे ग्रामीण जिल्हामधील वालचंदनगर पोलीस स्टेशन हे दुसरे पोलीस ठाणे ठरले आहे.

पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या अनुशंगाने दर शनिवारी तक्रार निवारण केले जाते, तसेच दाखल झालेल्या गुन्हांमधील 85 टक्के गुन्हयांचा निपटारा केलेला आहे. पायाभुत सुविधा, अदयावत तंत्रज्ञानचा वापर, कामकाजातील तत्परता, सायबर क्राईम, भौगौलिक परिसर, जनतेचे अभिप्राय, तंत्रज्ञान प्राविण्य, संगणकीकरण, दस्तऐवज नियंत्रण, रात्रगस्त, अवैध धंददे कारवाई तसेच गंभीर गुन्हे उघडकीस आणुन त्याप्रमाणे कार्यवाही करणे या सर्व गोष्टी आय.एस.ओ मानांकनासाठी पात्र ठरल्याने वालचंदनगर पोलीस स्टेशनला पात्र ठरल्याने पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाला आहे.

वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे बारामती इंदापुर रोडवरील पालखी महामार्गावर असलेले जंक्शन ता. इंदापुर येथे असुन हे संवेदनशील पोलीस स्टेशन आहे. सन 1990 मध्ये सदर पोलीस स्टेशनची स्थापना झाली असुन सन 2024 मध्ये सदर पोलीस स्टेशनसाठी 09 कोटी रुपयो खर्च करुन सुसज्ज इमारत बांधली आहे.

पोलीस स्टेशनला 05 एकरचा परिसर असुन सदर पोलीस स्टेशन आवारामध्य अधिकारी वर्गासाठी 04 निवासस्थानांची सोय केलेली आहे. तसेच परिसरात मध्ये 300 विविध प्रकारचे फळजाडे, देशी झाडांची लागवड केलेली आहे. तसेच नागरिकांसाठी व पोलीसांसाठी विविध प्रकाराचे दोन पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

पोलीस स्टेशन इमारती मध्ये पोलीस अधिकारी, फौजदार, गोपनीय, दत्परी कक्ष, पासपार्ट, बारनिशी, क्राईम, ठाणे अंमलदार, वायरलेस आदी विभागासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. महिला व पुरुष कैदयांसाठी कोठडीची सुविधा आहे. तसेच सुसज्ज असे स्वच्छता गृह देखील आहेत. सर्व खोल्यांमध्ये फर्निचर, पिण्याचे पणी, सोलर, फायर सिस्टीम अशा सुविधा दिलेल्या आहेत. तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वतंत्र आसन व्यवस्था तसेच त्यांना वाचन करण्यासाठी विविध प्रकारची वर्तमानपत्र, मासिक व घडामोडी अशी सुविधा करुन दिलेली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुर्दशन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे व त्यांचा सहकाऱ्यांनी या पोलीस स्टेशनचा कायापालट करुन उत्तम कामगिरी केलेली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow