इंदापुरात महसूल कर्मचारी संघटनेने केलं एक दिवस लेखणी बंद आंदोलन

Aug 14, 2025 - 18:50
 0  610
इंदापुरात महसूल कर्मचारी संघटनेने केलं एक दिवस लेखणी बंद आंदोलन

आय मिरर 

इंदापूर मधील महसूल कर्मचारी संघटनेने एक दिवस लेखणी बंद आंदोलन केलेय. इंदापूर शहरातून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत मंडळ अधिकारी अशोक पोळ यांना दमदाटी शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आणि मंडळ कार्यालय जाळून टाकत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या दोन पक्षकार महिलांवर कारवाई करण्याच्या मागणीच निवेदन इंदापूर पोलिसांना देण्यात आलंय.

अशोक संपत पोळ यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५० अन्वये अधिनियमीत व कायदेशीर पद्धतीने पारीत केलेल्या अर्धन्यायिक आदेशाने संबंधित प्रकरणामधील पक्षकार यांनी व्यथीत होऊन मंडल अधिकारी कार्यालय इंदापूर मध्ये 13 ऑगस्ट रोजी अशोक पोळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांचेवर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

तसेच सदरील मंडल अधिकारी कार्यालय पेट्रोल ओतून जाळून टाकणेची व पोळ यांना जीवे मारणेची धमकी देत त्यांचेवर हल्ला करणेचा प्रयत्न केलेला आहे असंही या तक्रारीतून म्हटलं आहे.

सदर हल्लेखोर या महिला असून त्यांची कृती ही बेकायदेशीर स्वरुपातील असून केवळ महसूली न्यायव्यवस्थेवर दबाव आणून बेकायदेशीर कृती साध्य करुन घेणेसाठी केलेली आहे.

सदर हल्लेखोर यांनी ग्राम महसूल अधिकारी इंदापूर यांचे कार्यालयामध्ये येऊन शासकीय कागदपत्रे फेकून देऊन तसेच कार्यालय जाळून टाकणेची धमकी देऊन त्यांचेवर केलेल्या भ्याड हल्याचा इंदापूर तालुक्यामधील सर्व महसूल अधिकारी/कर्मचारी, तसेच क्षेत्रिय कर्मचारी मंडल अधिकारी/ग्राम महसूल अधिकारी यांनी निषेध नोंदवला आहे.

सदर व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करुन त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आम्ही आज एक दिवस लेखणी बंद आंदोलन करत असल्याचेही या निवेदनात म्हटलं आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि तहसीलदार जीवन बनसोडे यांना हे निवेदन देण्यात आलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow