ना दारू ना मटन अहमदनगरच्या आगडगावला थर्टी फर्स्ट ला आमटी भाकरीचा बेत ! हा आदर्श इतरही गावांनी घ्यावा
आय मिरर(प्रसाद शिंदे)
31 डिसेंबर म्हटलं की दारूच्या पार्ट्या आणि मांसाहाराच्या पार्टी आल्या. परंतु याला अपवाद आहे अहमदनगर शहराजवळ असणारं आगडगाव येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान. आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानचा आमटी भाकरीचा महाप्रसाद या गावचा एक रोल मॉडेलच आहे.
यावर्षी 31 डिसेंबर रविवारी आल्याने याची पर्वणी साधत आगडगाव देवस्थानने रविवारच्या महाप्रसादाचा बेत अधीक केला असून या रविवारी 151 अन्नदात्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी नगर तालुक्यातून जवळजवळ वीस ते पंचवीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
What's Your Reaction?